जेव्हाही बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींचा उल्लेख होतो, तेव्हा तेव्हा ‘मस्तानी’ म्हणजेच दीपिका पदुकोण हिच्या नावाचा समावेश होतो. दीपिका सध्या तिच्या कारकीर्दीची शिखरावर आहे. ती रणवीर सिंग याच्यासोबत लग्नबंधनातही अडकली आहे. त्यांची जोडी बॉलिवूडच्या सर्वात रोमँटिक जोड्यांपैकी एक आहे. मात्र, रणवीरसोबत लग्नबंधनात अडकण्यापूर्वी दीपिकाचे नाव अनेक व्यक्तींशी जोडले गेले आहे. दीपिकाने घायाळ केलेल्या व्यक्तींमध्ये क्रिकेटपटूंपासून ते व्यावसायिक आणि अभिनेत्यांचाही समावेश आहे. दीपिका गुरुवारी (दि. 05 जानेवारी) तिचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने तिच्या एक्स बॉयफ्रेंड्सची यादी पाहूयात.
दीपिका पदुकोणचे एक्स बॉयफ्रेंड्स (Deepika Padukone Ex Boyfriends)
रणबीर कपूर
दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिच्या एक्स बॉयफ्रेंड्सच्या यादीत पहिले नाव येते रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याचे. दीपिका आणि रणबीर यांच्या रिलेशनशिपबद्दल अनेक जवळपास सर्वांनाच माहिती आहे. दीपिका रणबीरच्या प्रेमात इतकी बुडाली होती की, तिने रणबीरच्या नावाचा टॅटूदेखील काढला होता. मात्र, रणबीर आणि कॅटरिनामधील वाढती जवळीक पाहून तिने आपला वेगळा मार्ग निवडला.
View this post on Instagram
सिद्धार्थ मल्ल्या
व्यावसायिक विजय मल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या (Siddharth Mallya) आणि दीपिका पदुकोण यांच्या रिलेशनशिपनेही सोशल मीडियावर एकच खळबळ माजवली होती. सिद्धार्थ आणि दीपिकाला अनेकदा एकत्र स्पॉट केले गेले होते. दीपिकादेखील अनेकदा आयपीएल सामन्यांदरम्यान सिद्धार्थ मल्ल्याच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला चीअर करतानाही दिसली होती.
निहार पंड्या
असे म्हटले जाते की, दीपिकाने बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ती निहार पंड्या (Nihar Pandya) याला डेट करत होती. दोघे जवळपास 3 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळताच दीपिकाने तिचे मार्ग वेगळे केले.
उपेन पटेल
यामध्ये अभिनेता उपेन पटेल (Upen Patel) याच्या नावाचाही समावेश होतो. निहारनंतर दीपिकाच्या आयुष्यात उपेन पटेल याची एन्ट्री झाली होती. त्यांच्या नात्याविषयी माध्यमांमध्येही चर्चा होती. मात्र, दोघेही कधीच त्यांच्या नात्याविषयी बोलले नव्हते.
युवराज सिंग
एकेवेळी दीपिका आणि युवराज सिंग यांच्या नात्याची चर्चाही चांगलीच रंगली होती. दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र स्पॉट झाले होते. मात्र, दोघांनीही त्यांचे नाते कधीच स्वीकारले नव्हते. त्यांनी माध्यमांसमोर त्यांचे नाते मैत्रीपुरतेच मर्यादित ठेवले होते.
एमएस धोनी
दीपिकाच्या एक्स बॉयफ्रेंड्सच्या यादीत भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याचे नाव पाहून अनेकांना धक्का बसेल. मात्र, दीपिका आणि धोनी यांच्या डेटिंगच्या बातम्यांनी बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजवली होती. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नव्हते.
शेवटी दीपिकाच्या आयुष्यात रणवीर सिंग याची एन्ट्री झाली. ते दोघेही एका पुरस्कार सोहळ्यात भेटले होते. त्यानंतर त्यांनी 2013 साली आलेल्या ‘गोलियों की रासलीला रामलीला’ या सिनेमात पहिल्यांदा स्क्रीन शेअर केली होती. यादरम्यानचे ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी पुढे ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या सिनेमातही काम केले. त्यांनी एकमेकांना 6 वर्षे डेट केल्यानंतर 2018मध्ये लग्नाची गाठ बांधली. दीपिकाच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर ती ‘पठाण’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत शाहरुख खान (Shahrukh Khan) हा मुख्य भूमिकेत आहे. (actress deepika padukone birthday special unknown facts actress dated these 5 famous personalities before marriage)
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘अवतार 2’ने मारलं भारतीय बॉक्स ऑफिसचं मैदान, नुकत्याच हिट झालेल्या सिनेमाला पछाडत कमावले ‘एवढे’ कोटी
‘शार्क टँक इंडिया’ची जज आहे ‘एवढ्या’ कोटींची मालकीण; वर्षाकाठी कमावते पैसाच पैसा