बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना चर्चेत येण्यासाठी फार काही करण्याची गरजच पडत नाही. त्या घरातून बाहेर पडल्या तरी त्यांच्यामागे पॅपराजींची लाईन लागते. अशाच अभिनेत्रींमध्ये दीपिका पदुकोण हिच्या नावाचाही समावेश होतो. दीपिका ही अशी अभिनेत्री आहे, जी तिच्या जाहिराती, सिनेमा आणि फोटो- व्हिडिओंव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. मात्र, आता तिची बहीण आणि रणवीर सिंग याची मेहुणी अनिशा पदुकोण ही चर्चेत आहे. विशेष म्हणजे, तिचा आणि ग्लॅमर इंडस्ट्रीचा काहीही संबंध नसला, तरीही ती सौंदर्याच्या आणि प्रसिद्धीच्या बाबतीत भल्याभल्या अभिनेत्रींना मागे टाकते.
देशाची यशस्वी खेळाडू आहे अनिशा पदुकोण
दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अनिशा पदुकोण (Anisha Padukone) या बहिणींमध्ये ५ वर्षांचे अंतर आहे. दीपिका आणि अनिशा यांचे बालपण बंगळुरू येथे गेले आहे. अनिशाने माऊंट कार्मेल कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. तिने तिच्या वडिलांप्रमाणेच खेळात कारकीर्द घडवली. खरं तर, दीपिका आणि अनिशा यांचे वडील प्रकाश पदुकोण हे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू राहिले आहेत. दीपिका ही तिच्या वडिलांना ऑफस्क्रीन हिरो मानते, तर अनिशाने तिच्या वडिलांना आपला आदर्श बनवले आहे. अनिशा हिने बहीण दीपिकाचा मार्ग न धरता ती आज एक यशस्वी गोल्फर (Anisha Padukone Golfer) बनली आहे.
View this post on Instagram
अनिशाला आवडतं साधं राहणीमान
अनिशा ही स्वत:ला लाईमलाईटपासून दूर ठेवणे पसंत करते. तिला सोशल मीडियावर लाखो फॉलोव्हर्स आहेत. मात्र, तरीही ती काही निवडक फोटोच शेअर करत असते. मात्र, दुसरीकडे दीपिका ही ग्लॅमरसच्या बाबतीत अव्वल क्रमांकावर आहे, तर अनिशाला साधं राहणीमान आवडतं.
View this post on Instagram
बहीण दीपिकाची कार्बन कॉपी दिसते अनिशा
अनेक भावंडं ही एकसारखीच दिसत असतात. दीपिका आणि अनिशाचंही असंच काहीसं आहे. या दोघींचे सोशल मीडियावर असे काही फोटो आहेत, ज्यामध्ये अनिशा ही बहीण दीपिकाची कार्बन कॉपी असल्याचे दिसते.
View this post on Instagram
आंतरराष्ट्रीय स्तरावर केलंय भारताचे प्रतिनिधित्व
रणवीर सिंग (Ranveer Singh) याची मेहुणी अनिशा ही शानदार गोल्फ खेळते. तिने अनेकवेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच, तिने देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. असे म्हटले जाते की, अनिशा फक्त १२ वर्षांची होती, तेव्हापासून ती गोल्फ खेळ खेळते. इतकेच नाही, तर तिने गोल्फव्यतिरिक्त क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन आणि हॉकीसारख्या खेळातही आपला हात आजमावला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आवरा रे! फक्त ३ नाड्यांनी बांधलेल्या ड्रेसमध्ये नोराने दिल्या एकापेक्षा एक पोझ, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
पावसात भिजत नीलम गिरीने वातावरण केलं गरम, अभिनेत्रीच्या काळ्या रंगाच्या साडीतील डान्सने चाहत्यांनाही भुरळ
लाईव्ह शोमध्ये ठुमके लावत होती सपना चौधरी, तेव्हाच पैसे दाखवत व्यक्तीने केले घाणेरडे कृत्य