पावसात भिजत नीलम गिरीने वातावरण केलं गरम, अभिनेत्रीच्या काळ्या रंगाच्या साडीतील डान्सने चाहत्यांनाही भुरळ

बॉलिवूड कलाकारांइतकीच कदाचित त्याहून अधिक लोकप्रियता भोजपुरी इंडस्ट्रीतील कलाकारांनाही मिळते. सिनेमे आणि नवनवीन गाण्यांच्या माध्यमातून भोजपुरी कलाकार चाहत्यांची मने जिंकत आहेत. या कलाकारांमध्ये अभिनेत्री नीलम गिरी हिचादेखील समावेश आहे. नीलम हिला कोणत्याही परिचयाची गरज नाही. ती तिच्या प्रत्येक म्युझिक अल्बममध्ये आपल्या अदांची जादू दाखवताना दिसते. नीलमचा प्रत्येक अंदाज हा कातिलाना आहे. नीलम हिच्यासोबतच भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायिका शिल्पी राज हीदेखील अल्बम हिट करण्यात मोलाचे योगदान देते.

शिल्पी राज (Shilpi Raj) हा भोजपुरी जगतातील प्रसिद्ध चेहरा आहे. तिने खूप कमी काळात यशाचे शिखर गाठले आहे. शिल्पीचा चाहतावर्गही चांगलाच मोठा आहे. तिचे कोणतेही नवीन गाणे प्रदर्शित होताच, तिचे चाहते काही क्षणातच ते गाणे व्हायरल करतात. मात्र, सध्या शिल्पीचे एक गाणे चांगलेच चर्चेत आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या या गाण्याचे नाव ‘बदरवा’ (Badarwa) असे आहे. या गाण्यात नीलम गिरी (Neelam Giri) भिजताना दिसत आहे. पावसात भिजताना नीलम गिरीच्या अदा तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहेत. काळ्या आणि गुलाबी रंगाच्या साडीत नीलम कोणत्याही अस्परेपेक्षा कमी दिसत नसल्याचे व्हिडिओवरून दिसते.

शिल्पी राज आणि नीलम गिरी यांच्या या गाण्याला प्रदर्शित होऊन आता १ वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. हे गाणे वर्ल्ड रेकॉर्ड भोजपुरी या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याला आतापर्यंत २ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, या गाण्याला १ लाख ७० हजारांहून अधिक लाईक्स आणि ४ हजारांहून अधिक कमेंट्सही मिळाल्या आहेत.

विशेष म्हणजे, या गाण्याला एक वर्ष होऊनही चाहत्यांमध्ये या गाण्याची क्रेझ वाढत आहे. शिल्पी राज हिच्या या गाण्याचे गीत विजय चौहान यांनी लिहिले आहेत. तसेच, या गाण्याला आर्या शर्मा यांनी संगीत दिले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
लाईव्ह शोमध्ये ठुमके लावत होती सपना चौधरी, तेव्हाच पैसे दाखवत व्यक्तीने केले घाणेरडे कृत्य
गाण्याला आवाज भोजपुरी स्टारचा, पण मैफील लुटली मनीषाच्या ठुमक्यांनी; पाहून तुम्हीही लागाल नाचू
वडील आमिर खानच्या खांद्यावरचं ओझं लेक आयरानं केलं कमी, सिनेमाच्या प्रमोशनसाठी बॉयफ्रेंडलाही घेतलं सोबत

Latest Post