बिनधास्त, बेधडक आणि निर्भीड असणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये दिया मिर्झा हिच्या नावाचाही समावेश होतो. दिया कोणताही मुद्दा असो, त्यावर आपले परखड मत मांडताना दिसते. नुकतेच तिने लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंध आणि गर्भधारणेवर मोकळेपणाने चर्चा केली. यावेळी तिने स्पष्ट केले की, ही एक वैयक्तिक निवड आहे आणि तेच आनंद साजरा करू शकतात, जे निर्णय घेताना कोणालाही घाबरत नाहीत.
अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) हिने फेब्रुवारी, 2021 मध्ये व्यावसायिक वैभव रेखी (Vaibhav Rekhi) याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या काही महिन्यानंतर म्हणजेच एप्रिलमध्ये तिने प्रेग्नंट असल्याची घोषणा केली होती. यानंतर दिया लग्नाआधी प्रेग्नंट (Dia Mirza Pregnant Before Marriage) झाल्याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या प्रश्नांची उत्तरे आता दियाने दिली आहेत. तिने सांगितले होते की, प्रेग्नंट झाल्यामुळे तिने लग्न केले नव्हते. मात्र, लग्नाच्या तयारीदरम्यान तिला प्रेग्नंसीबाबत समजले होते. दियाने त्याच वर्षी जुलैमध्ये मुलगा अव्यानला जन्म दिला होता.
View this post on Instagram
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिया म्हणाली की, समाजात अनेक लोक लग्नापूर्वी शारीरिक संबंध आणि प्रेग्नंसीला ‘अधिकार’ मानतात. ती म्हणाली, “मला वाटते की, ही वैयक्तिक निवडीची बाब आहे, जी केवळ तेच लोक साजरे करू शकतात जे त्यांच्या वैयक्तिक निवडींना घाबरत नाहीत. मात्र, या विषयावर काही लोकांचे मत वेगळे असू शकते किंवा ते चुकीचे देखील मानू शकतात.”
दिया मिर्झाच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर ती लवकरच अनुभव सिन्हा (Anubhav Sinha) यांच्या ‘भीड’ या सिनेमात दिसणार आहे. यापूर्वी दिया त्यांच्यासोबत ‘कॅश’, ‘दस’ आणि ‘थप्पड’ या सिनेमात काम केले आहे. याव्यतिरिक्त ती तापसी पन्नू अभिनित ‘धक धक’मध्येही दिसणार आहे. या सिनेमात रत्ना पाठक शाह, फातिमा सना शेख आणि संजना सांघी यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा यावर्षी ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहे. (actress dia mirza expressed her views on premarital sex and pregnancy)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तर मी आणि माझे बाळ दोघेही दगावलो असतो’, दिया मिर्जाने सांगितला जिवावर बेतलेला प्रसंग
तूच खरा देवदूत! सलमान खानने वाचवला होता अभिनेत्री दिया मिर्झाच्या आईचा जीव, एकाच फोनवर पोहोचला होता घरी