Sunday, May 19, 2024

‘तर मी आणि माझे बाळ दोघेही दगावलो असतो’, दिया मिर्जाने सांगितला जिवावर बेतलेला प्रसंग

दिया मिर्झा ही बॉलिवूडची लोकप्रिय आभिनेत्री म्हणुन ओळखली जाते. तिने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे, तिच्या काही चित्रपटांतील गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत जेवढे आधी होते. ती सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते, तीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.  दियाने गेल्या वर्षी एका बाळाला जन्म दिला आहे, तिने काहिदिवसापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तीच्या प्रेग्नेंसीबद्दलचा एक भयानक किस्सा सांगितला आहे. चला जाणून घेउया काय आहे तो किस्सा.

  प्रेग्नेंमसीमध्ये बॉडिमध्ये पसरले

दिया मिर्झा ( Dia Mirza ) ने एका दिलेल्या मुलाखतीदरम्यान तिने  प्रेग्नेंसीबद्दल सांगितले आहे, तिची प्रिमॅच्युर डिलेवरी झाल्याने दियाचा आणि बाळाचा जीव धोक्यात आला होता. प्रेग्नेंसीच्या पाचव्या महिण्यात तीचे अपेंडिक्सचे ऑपरेशन करावे लागले होते. हे ऑपरेशन केल्यानंतर तीला बैक्टेरियल इनफेंक्शन झाले होते त्याच्यामुळे तिच्या प्लेसेंटामधून रक्तस्त्रव झाला होता. अशामध्येच डॉक्टरांनी बाळाला बाहेर  काढण्याचा निर्णय घेतला होता आणि हे आमच्या दोघांसाठी घातक असल्याचे दियाने सांगितले, “बाळाला जन्म दिल्यानंतर 36 तासाच्या आत त्याला  ऑपरेशनच्या सामोरे जावे लागले होते.”

बाळाला हात लावण्याचीही बंदी होती

दिया मिर्झाने सांगितले की “तिच्या बाळाला साडेतीन महिन्यानंतर आणखी एक ऑपरेशन करावे लागले होते. या कठिण  परिस्थितीतही  तीच्या बाळापशी जाउ शकत नव्हेती बाळाला NICU मध्ये ठेवल होते. अडीज महिन्यापर्यत मी त्याला मांडीवर घेउ शकले नाही,” अशी खंत तिने व्यक्त केली.

हे सगळं कोराना काळाच्या दुसऱ्या लाटेमध्ये झाले होते अभिनेत्रीने आपले दु:ख व्यक्त करत  बोलली “माझे बाळ खूपच लहान आणि कोमल होते त्यावेळेस कोरोना काळ असल्यामुळे मला आणखी दुसरेही नियम पाळावे लागत होते. मला एका हप्त्यामध्ये फक्त दोनच वेळेस बाळाला पाहायला मिळत असे, हे माझ्यासाठी खूपच कठिण होते पण मला विश्वास होता की माझे बाळ माझ्यापासून लांब नाही जाणार. तो दुखण्याशी लढेल आणि माझ्याकडे येइल.”

दिया मिर्झाच्या करिअर बद्दल सांगायचे झाले तर ती चित्रपटा मध्ये वापस येणार आहे. अभिनेत्री दिया मिर्झा धक-धक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आता हे बघणे भारी असेल की दियाच्या चित्रपटाला प्रेक्षकाचा किती प्रतिसाद मिळतो. (dia mirza recalls life threatening experience during her delivery reveals that she was not allowed to hold her child for months tmovf)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘चित्रपटसृष्टीमध्ये होतो लिंगभेद’, अभिनेत्री दिया मिर्झाचा फिल्म इंडस्ट्रीवर मोठा आरोप

शिव ठाकरेची एक्स गर्लफ्रेंड शोमध्ये करणार वाइल्ड कार्ड एन्ट्री?

हे देखील वाचा