Wednesday, June 26, 2024

दिवाळीचा डबल आनंद साजरा करणाऱ्या दिया मिर्झाने फॅमिली फोटो शेअर करत दाखवली मुलाची झलक

देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नुकतेच सर्वांनी लक्ष्मीपूजन केले. लक्ष्मीपुजनाचा उत्साह सामान्यांपासून कलाकारांपर्यंत मोठ्या प्रमाणात दिसून आला. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरात दिवाळीचा सण मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांसोबत त्यांच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत सर्वांना या सेलिब्रेशनची झलक दाखवली आहे. लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करणारे अनेक कलाकारही होते. या कलाकारांमध्ये अभिनेत्री दिया मिर्झाच्या नावाचाही समावेश आहे. यावर्षी दियाच्या दिवाळीचा दुहेरी आनंद आहे. एक तर तिचा लग्नानंतरचा पहिला दिवाळसण आहे आणि दुसरे कारण म्हणजे दियाच्या मुलाचा अव्यानचा जन्म झाला आहे.

दियाच्या लग्नानंतर आणि मुलाच्या जन्मानंतरची ही पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळे दियाने हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला. दियानेही सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना झलक दाखवली आहे. दियाने दिवाळीची पूजा केल्यानंतर तिच्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये ती पती वैभव रेखी मुलगा अव्यान आणि वैभवची मुलगी समायरा दिसत आहे. या फोटोच्या माध्यमातून दियाने पहिल्यांदाच चाहत्यांना मुलगा अव्यानची झलक दाखवली आहे. मात्र या फोटोमध्ये तिच्या मुलाचा चेहरा दिसत नाही. यासोबतच तिने तिच्या इंंस्टा स्टोरीवर पूजा करतानाचा एक फोटो शेअर केला आहे.

फोटोत दिया आणि तिचे कुटुंब पारंपारिक पोशाखात दिसत असून, चाहत्यांना त्यांचा हा कौटुंबिक फोटो खूप आवडत आहे. दियाची वैभव आणि तिच्या मुलीसोबतची ही पहिली दिवाळी असून, आई म्हणून ही दिवाळी दियासाठी खूप खास आहे.

दियाने एका मुलाखतीत सांगितले की, मुलगा अव्यानसोबत पहिली दिवाळी साजरी करताना तिला खूप छान वाटत आहे. यापूर्वी दियाने अव्यानच्या रूमची झलक दाखवली होती.

दिया मिर्झाने १५ फेब्रुवारी २०२१ रोजी बिझनेसमन वैभव रेखीसोबत लग्न केले. लग्नानंतर काही महिन्यांतच दियाने तिच्या चाहत्यांना ती आई होणार असल्याचे सांगत आश्चर्याचा धक्का दिला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ मराठी अभिनेत्रींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या चाहत्यांना दीपावलीच्या शुभेच्छा

-पारंपारिक वेशभूषेत ‘या’ मराठमोळ्या लावण्यवतींनी दिल्या दिपावलीच्या शुभेच्छा! पाहा फोटो

-रितेश भैय्याचा अंदाजच लई भारी! बच्चे कंपनीसोबतचा व्हिडिओ शेअर करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

हे देखील वाचा