Friday, December 1, 2023

अभिनेत्री दिशा पटानीचा लूक पाहून चाहते संतापले; म्हणाले, ‘वेडी झाली आहे…’

देशभरात गणेश चतुर्थी साजरी केली जाते. 19 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. यावेळी बॉलीवूडच्या अनेक स्टार्सनीही बाप्पाचे घरी मोठ्या थाटामाटात स्वागत केले. सगळीकडे मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबानेही त्यांच्या घरी गणपती बसवला, जिथे बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.

यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी देखील उपस्थित होती. तसेच अभिनेत्री रेखा देखील उपस्थित होती. त्याचवेळी प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी एक वेगळ्याच लूकमध्ये पाहायला मिळाली. दिशा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. दिशा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोंवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

नुकताच दिशाचा लूक पाहून चाहते संतापले आहेत. मुकेश अंबानी-नीता अंबानी यांच्या घरातील त्यांच्या लूकने स्टार्सने बरीच प्रसिद्धी मिळवली, परंतु ‘वेलकम टू द जंगल’ अभिनेत्री दिशा पटानीचा लूक सोशल मीडियावर वापरकर्त्यांना अजिबात आवडला नाही. गणपती बाप्पाच्या आरतीसाठी आलेल्या दिशाने या खास सोहळ्यासाठी पीच रंगाची साडी परिधान केली आहे. तिने स्लिव्हलेस ब्लाऊज घातला होता.

 गणपती उत्सवात पूजेच्या वेळी साडी नेसण्याची तिची पद्धत सोशल मीडियावर वापरकर्त्यांच्या आवडली नाही. त्यामुळे तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, “अशा पारंपारिक कार्यक्रमात कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत, दिशा कधी समजेल?” आणखी एका यूजरने लिहिले की, “गणेश चतुर्थी सारख्या प्रसंगी देखील दिशा पटानीला बिकिनीसारखे कपडे घालणे.” आणखी एका यूजरने लिहिले, “दिशा वेडी झाली आहे का, आम्ही भारतात राहतो, अशा खास प्रसंगी बाहेरचे लोकही भारतीय संस्कृतीचा आदर करतात.” (Actress Disha Patani look angered fans)

आधिक वाचा-
‘तीन अडकून सीताराम’मधील ‘दुनिया गेली तेल लावत’ हे गाणे प्रदर्शित; पाहा व्हिडिओ
‘पिंकीचा विजय असो’ फेम ‘या’ अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

हे देखील वाचा