Friday, December 8, 2023

‘पिंकीचा विजय असो’ फेम ‘या’ अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अभिनेत्री शरयू सोनावणेने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. ती ‘पिंकाचा विजय असो’ या मालिकेतून प्रसिद्ध झाली. शरयूने ‘लागीर झालं जी’ यासारख्या मालिकांमध्येही काम केले आहे. स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘पिंकाचा विजय असो’तील अभिनेत्री शरयू सोनावणे हिने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. शरयूने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही आनंददायी बातमी दिली आहे.

शरयूने (Sharyu Sonavane)  तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत लिहिले आहे की, “आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलं आहे. हॅपी अ‍ॅण्ड एंगेज… गणपती बाप्पा मोरया.” शरयूच्या साखरपुड्याची बातमी कळताच तिच्या चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. शरयू आता साखरपुड्याबद्दल काय बोलणार आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

शरयूने केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, तु खूप छान दिसत आहे. दुसऱ्याने लिहिले की, “बार्बी गर्ल ” तर आणखी एकाने लिहिले की, “आम्ही तुला मिस करत आहोत पिंकी” शरयूचा होणारा नवरा जयंत लाडे हा एक प्रसिद्ध फिल्ममेकर आणि निर्माता आहे. शरयूने साखरपुड्याचे फोटो पोस्ट करताच मराठी सेलिब्रिटी आणि फॅन्सनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

https://www.instagram.com/p/CxYA896rCYL/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA== 

मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील मोजक्या तरुण अभिनेत्रींपैकी एक असलेल्या शरयू सोनावणेच्या आयुष्यात नवा अध्याय सुरू झाला आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर तिने तिच्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांना दिली. शरयू सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या पोस्टवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. (Actress Sharyu Sonavane of ‘Pinky Chi Vijay Aso’ fame has secretly made love to Urkal)

आधिक वाचा-
अंबानींच्या घरी गणरायाचा जल्लोष; 68वर्षीय रेखाच्या लूकने चाहत्यांना घातली भूरळ
‘तीन अडकून सीताराम’मधील – -‘दुनिया गेली तेल लावत’ हे गाणे प्रदर्शित; पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा