Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड अभिनेत्री दिव्या दत्ताला ‘अशा’ दिग्दर्शकांसोबत काम करणे नाही पसंत; म्हणाली, ‘मी नर्व्हस होते…’

अभिनेत्री दिव्या दत्ताला ‘अशा’ दिग्दर्शकांसोबत काम करणे नाही पसंत; म्हणाली, ‘मी नर्व्हस होते…’

अभिनेत्री दिव्या दत्ताने रुपेरी पडद्यावर अनेक भूमिका साकारल्या आहे. कधी एकदम निरागस, तर कधी गंभीर अशा अनेक भूमिका तिने साकारल्या आहेत. इतकेच नव्हे तर सुपरहिट चित्रपटांचाही ती एक भाग होती. दिव्या दत्ताने तिच्या कारकिर्दीत उत्तम कामगिरी केली. तसेच चित्रपटांमधील उत्कृष्ट अभिनयासाठी अनेक पुरस्कार जिंकले. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजही जेव्हा दिव्या दत्ता नवीन प्रोजेक्टवर काम करते किंवा तिचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी खूप नर्व्हस होते. याचा खुलासा स्वतः दिव्या दत्ताने केला आहे.

दिव्या चित्रपटांबद्दल असायची नर्व्हस
माध्यमांशी बोलताना दिव्या दत्ता म्हणाली की, “कोणत्याही कलाकारासाठी, हा क्षण परीक्षेप्रमाणे असतो. कारण आम्ही एखाद्या गोष्टीवर खूप मेहनत घेतलेली असते. आमच्यासाठी, आम्ही साकारलेल्या भूमिकेसाठी अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार जिंकणे मला खरोखर उत्साह आणि नर्व्हस करतात.” दिव्या दत्ता पुढे म्हणाली की, “मी नर्व्हस होते याचा मला अभिमान आहे आणि हे कबूल करताना मला लाज वाटत नाही.”

दिव्या दत्ता स्वतःवर दबाव घेत नाही
दिव्या दत्ताला ‘शीर कोरमा’मधील कामासाठी खूप कौतुक मिळाले. पुढे बोलताना दिव्या दत्ताने सांगितले की, “ती कोणत्याही प्रोजेक्टचा एक भाग तेव्हाच बनते, जेव्हा दिग्दर्शकाला तिच्याकडून एक कलाकार म्हणून तिला काय हवे आहे हे स्पष्ट करतात.” दिव्या दत्ता म्हणाली की, “मी आधीच स्पष्ट आहे की, मी स्वतःवर सर्व दबाव घेणार नाही.”

अशा दिग्दर्शकांसोबत करत नव्हती काम
माध्यमांशी बोलताना दिव्याने म्हटले की, “मी अशा दिग्दर्शकांसोबत काम करत नाही, जे बोलतात की काहीही करा. माझा अनुभव असा आहे की, जेव्हा दिग्दर्शकाने मला काहीही करायला सांगितले. तेव्हाच मी ठरवले की काही दिग्दर्शक उदाहरण बनतात आणि काही त्यांचे अनुकरण करतात. मला अशा दिग्दर्शकांसोबत काम करायला आवडते, जे मला आधी साकारलेल्या पात्रांपेक्षा वेगळे काहीतरी करायला देतात.”

जुनी पात्रे साकारताना नर्व्हस नसते
दिव्या म्हणाली की, जेव्हा ती तिच्या कोणत्याही जुन्या पात्राची पुनरावृत्ती करते, तेव्हा तिला कोणत्याही प्रकारच्या आव्हानाला सामोरे जावे लागत नाही किंवा ती नर्व्हस होत नाही. त्या गोष्टींना काही अर्थ नाही. दिव्या म्हणाली की, “मी अशा दिग्दर्शकांसोबत काम करत असताना स्वतःला भाग्यवान समजते, जे मला यापूर्वी कधीही न केलेल्या भूमिका ऑफर करतात, पण जर मी पूर्वीप्रमाणेच पात्र करत असेल, तर काही हरकत नाही.”

‘हे’ आगामी चित्रपट आहेत
दिव्या दत्ता अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीचा भाग आहे. तिने १९९४ मध्ये ‘इश्क में जीना इश्क में मरना’ या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर तिने ‘वीर-झारा’ ते ‘वीरगती’, ‘इसकी टोपी उसके सर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. दिव्या अलीकडेच ‘शीर-कोरमा’ चित्रपटात दिसली होती. तिचा आगामी चित्रपट ‘धाकड’ हा आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राखी सावंतचा AAP नेते राघव चड्ढांना इशारा; म्हणाली, ‘माझ्या नावापासून दूर राहा, नाहीतर त्याचा…’

-‘विश्वातील सर्वात सुंदर मुलगी’, राजेश्वरी खरातच्या ग्लॅमरस अंदाजावर होतोय कौतुकाचा वर्षाव

-स्वतःचं घर विकून डॉ. अमोल कोल्हेंनी केली होती ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेची निर्मिती, वाचा त्यांचा जीवनप्रवास

हे देखील वाचा