Tuesday, March 5, 2024

‘…त्यामुळेच मी एकटे झोपण्यासाठी घाबरायची’, अभिनेत्री ईशा गुप्ताही झाली होती ‘कास्टिंग काऊच’ची शिकार

बॉलिवूड वरवर बघताना सर्वांना खूपच मोहक वाटते. यात असणारा पैसा, ग्लॅमर, प्रसिद्धी, लोकप्रियता पाहून अनेकांना त्याची भुरळ पडते. मात्र, जसे हाताची पाचही बोटं सारखी नसतात. तसेच सर्व माणसे चांगली असतात असे नाही. जिथे चांगली माणसं असतात तिथे वाईट माणसेही असतातच असतात. बॉलिवूड असेही वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते आणि बहुतकरून बॉलिवूडबद्दल अनेक वाईट गोष्टीच समोर येत असतात. बॉलिवूडमध्ये अतिशय सामान्य झालेला एक शब्द म्हणजे ‘कास्टिंग काऊच’ होय. अभिनेत्रींना किंबहुना अभिनेत्यांना देखील या घाणेरड्या प्रकाराला सामोरे जावे लागते. या प्रकाराबद्दल अनेक कलाकार समोर येऊन त्यांचा अनुभव सांगतात. असाच एक अनुभव अभिनेत्री ईशा गुप्ताने सांगितला होता. ईशा रविवारी (२८ नोव्हेंबर) तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिने सांगितलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबाबत…

ईशाने सांगितले की, “इंडस्ट्रीमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांना खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्या तुलनेत स्टार्सकिड्सला खूपच कमी त्रास होतो. मला एक निर्माता चित्रपटातून काढण्यासाठी खूपच तत्पर होता याचे कारण म्हणजे मी त्याच्यासोबत रात्र घालवण्यास नकार दिला होता.” पुढे ईशा म्हणाली की, “माझ्या संघर्षाच्या काळात मी मेकअप आर्टिस्टसोबत रूम शेअर करत होती. याचे कारण म्हणजे मला भुताची भीती वगैरे होती असे नाही तर मला भीती होती एका माणसाची. त्यामुळेच मी एकटे झोपण्यासाठी घाबरायची.” (Actress Esha Gupta Shared Her Casting Couch Experience Know On Her Birthday)

ईशा म्हणाली, “मी एका व्यक्तीचे खूप घाणेरडे रूप पहिले होते. त्यामुळे घाबरली होती, शूटिंगच्या मधेच त्या निर्मात्याने सांगितले की, त्याला मला चित्रपटातून काढून टाकायचे आहे. कारण मी त्याच्यासोबत एक रात्र घालवण्यास नकार दिला होता. तोपर्यंत मी पाच दिवसांचे शूटिंग केले होते. मात्र हे सर्व कलाकारांच्या मुलांना नाही सहन करावे लागत. कारण, अशा लोकांना माहित असते की, त्यांनी असे काही केले तर त्या मुलांचे पालक त्यांना मारून टाकतील.”

ईशाने इमरान हाश्मीसोबत जन्नत २ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती ‘राज ३’, ‘रुस्तम’, ‘बादशाहो’, ‘कमांडो २’ या सिनेमांसोबतच ती काही तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ हॉलिवूड सिंगरकडे पाहून बप्पी दा झाले होते प्रभावित, विचार करायचे, ‘माझ्याकडेही पैसा असता…’

-‘फिट ऍंड फाईन’ दिसणारे अनिल कपूर ‘या’ आजाराने आहेत त्रस्त, व्हिडिओ शेअर करत स्वत: केला खुलासा

-Bigg Boss 15: रितेशच्या अगोदर एका डॉनसोबत होतं राखी सावंतचं अफेअर, स्वतः केला खुलासा

हे देखील वाचा