Tuesday, June 18, 2024

Bigg Boss 15: रितेशच्या अगोदर एका डॉनसोबत होतं राखी सावंतचं अफेअर, स्वतः केला खुलासा

‘बिग बॉस १५’चा आठवा आठवडा केवळ घरातील सदस्यांसाठीच नाही तर प्रेक्षकांसाठीही खूप मजेशीर होता. या आठवड्यात चार व्हीआयपी सदस्य म्हणजे, देवोलिना भट्टाचार्जी, रश्मी देसाई, राखी सावंत आणि तिचा पती रितेश बिग बॉसच्या घरात दाखल झाले. महत्वाचे म्हणजे, घरातील चौथा व्हीआयपी सदस्य राखी सावंतचा पती रितेशला पाहण्यासाठी, बिग बॉसच्या प्रेक्षकांपासून घरातील सदस्यांपर्यंत सर्वांनाच उत्सुकता होती. आता सर्वांनाच त्याची झलक पाहायला मिळाली आहे.

सदस्यांनी केले जोरदार स्वागत
राखी सावंतने नेहमीच आपल्या स्टाईलने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यावेळी ती बिग बॉसच्या बहुतेक स्पर्धकांच्या अगदी जवळ आहे. तर सदस्यांनी तिचा पती रितेशचेही मनापासून स्वागत करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. राजीव अडातियाने त्याच्यासाठी चहा बनवला, तर नंतर कुटुंबातील काही सदस्यांनी मिळून त्याच्यासाठी खास केक बनवला. (bigg boss 15 rakhi sawant revealed that before marrying to ritesh she was dating a don)

रितेशने केला पहिल्या भेटीचा खुलासा
रितेश घरी आल्यावर सर्वांनी त्याचे स्वागत केले. पण घरात व्हीआयपी सदस्य म्हणून आलेल्या रश्मी देसाईला त्याची आणि राखीची प्रेमकहाणी कशी सुरू झाली, हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती. रश्मी आणि कुटुंबातील इतर सदस्यांसमोर खुलासा करताना रितेशने सांगितले की, तो पहिल्यांदा राखी सावंतशी व्हॉट्सऍपद्वारे बोलला होता.

अडचणीत दिली राखीने साथ
रितेशने आपल्या प्रेमकथेबद्दल आणखी खुलासा करत सांगितले की, तो कंपनीच्या हातून एक-दोन कॉन्ट्रॅक्ट गमावल्यामुळे खूप अस्वस्थ होता. त्यादरम्यान त्याने राखी सावंतला व्हॉट्सऍपवर मेसेज केला. सुरुवातीला राखी सावंतने त्याला ब्लॉक केले. पण जेव्हा हळूहळू दोघांमध्ये संवाद वाढू लागला, तेव्हा राखी सावंतने त्याच्या अडचणीत त्याला साथ दिली.

राखी सावंतने केले होते डॉनला डेट
राखी सावंतने सांगितले की, रितेशच्या आधी ती एका मुलाला डेट करत होती. पण नंतर तिला कळले की तो मुलगा डॉन आहे आणि जेव्हा ती त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा तो तिला धमकावत होता. त्यामुळे राखी खूप नाराज झाली आणि त्यानंतर तिने मुलांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिने रितेशलाही ब्लॉक केले.

राखी प्रेमाने म्हणते ‘पापा’
घरात प्रवेश करताच राखी बरीच धमाल केली. यासोबतच तिने रितेशला प्रेमाने ‘पापा’ म्हणत असल्याचा खुलासाही केला. राखी सावंत आणि रितेश यांचे २ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. राखीने तिच्या पतीचा चेहरा फार काळ कोणाला दाखवली नव्हता. कारण देताना राखीने सांगितले की, तिचा नवरा लॉकडाऊनमध्ये बाहेर होता आणि ती भारतात होती आणि ती स्वतः तिच्या पतीपासून बराच काळ दूर राहिली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अर्रर्रर्र! कॅटरिना कैफ आणि विकी कौशल करणार नाही लग्न? नातेवाईकाने केला मोठा खुलासा

-अश्लील चित्रपट प्रकरणात पुन्हा वाढल्या राज कुंद्राच्या अडचणी, न्यायालयाकडून फेटाळण्यात आला अटकपूर्व जामीन

-Bigg Boss 15; जय भानुशाली झाला शोमधून आऊट, तर नेहा भसीन आणि विशाल कोटियानही झाले बेघर

हे देखील वाचा