Friday, July 5, 2024

‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील ‘या’ अभिनेत्रीने सोडली मालिका, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

छोट्या पडद्यावर कलर्स मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhe Bharli) ही मालिका खूप कमी काळातच चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला चाहत्यांकडून प्रचंड प्रेम व प्रतिसाद मिळत असतो. या मालिकेत लतिका हिची भूमिका अक्षया नाईक (Akshay Naik) या अभिनेत्रीने अगदी चोखपणे साकारून चाहत्यांच्या मनात आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. त्याचबरोबर मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या अभ्या पात्राची भूमिका समीर परांजपे (Sameer Paranjape) या अभिनेत्याने साकारली आहे. या मालिकेचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. मात्र, या मालिकेच्या चाहत्यांसाठी आता मालिकेतून एक वाईट बातमी समोर आली आहे. या मालिकेतील एका अभिनेत्रीने मालिका सोडल्याची माहिती समोर आली आहे. चला तर मग जाणून घेऊया ही अभिनेत्री कोण आहे.

अलीकडच्या काळात मालिकेत अभ्या आणि लतिका यांच्यात दुरावा निर्माण झाल्याने ते दोघे वेगळे राहत होते. त्यामुळे मालिका प्रेक्षकांचे हिरमोड करत होती. त्याचवेळी मालिकेत आपल्या दमदार अभिनयाने एन्ट्री करत या अभिनेत्रीने मालिकेत ट्विस्ट आणला आणि प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण करण्यास यशस्वी झाली. ती अभिनेत्री म्हणजे नंदिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आदिती द्रविड (Aditi Dravid) होय. तिचा या मालिकेत दमदार अभिनय पाहून तिच्यावर अनेक प्रेक्षक प्रभावित झाले होते. मात्र, ती आता ही मालिका सोडणार असल्याची माहिती समोर येताच तिच्या चाहत्यांना दुःखद धक्का बसणार आहे.

आदितीने ही मालिका सोडण्यामागचे कारण देखील समोर आले आहे. असे म्हटले जात आहे की, आदितीची प्रकृती खराब असून, तिला डेंग्यूचे निदान झाल्यामुळे आता मालिकेत काम करता येणार नाही. त्यामुळे ती या मालिकेतून ब्रेक घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

आदिती द्रविडच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेपूर्वी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ती ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत पाहायला मिळाली होती, ज्यात तिने शनायाची मैत्रीण म्हणून काम केले होते. त्याचबरोबर ‘या गोजिरवाण्या घरात’साठी तिला सर्वोत्कृष्ट नायिका म्हणून पुरस्कार देखील मिळाला आहे. याशिवाय ती ‘बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत बाबासाहेब आंबेडकर यांची मुलगी तुळसाच्या भूमिकेत दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अशोकमामांसोबत ‘गंमत जंमत’ चित्रपटात झळकलेल्या ‘चारुशीला साबळे’ नंतर इंडस्ट्रीतून अचानक झाल्या गायब, आज आहे…

-तिसऱ्या आठवड्यातही ‘झिम्मा’ हाऊसफुल, सिद्धार्थ चांदेकरने सोशल मीडियावर केला व्हिडिओ शेअर

‘मीरा आणि मनू’ने धरला ‘नाटु नाटु’ गाण्यावर ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा