आनंदाची बातमी! हॉलिवूडची ‘वंडर वुमन’ बनणार तिसऱ्यांदा आई, फोटो शेअर करत दिली माहिती


बॉलिवूडमधील कलाकारांच्या घरी नवीन पाहुण्यांचे आगमन होत आहे, हे तर सर्वांनाच माहिती आहे. अशातच आता आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे हॉलिवूडची एक अभिनेत्रीही आपल्या तिसऱ्या अपत्याला जन्म देणार आहे. ही माहिती स्वत: अभिनेत्रीने दिली आहे. ही अभिनेत्री म्हणजेच हॉलिवूडची ‘वंडर वुमन’ नावाने प्रसिद्ध असलेली ‘गॅल गॅडोट’ होय. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे.

गॅलने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या कुटुंबाचा एक फोटो शेअर करत, आपल्या घरी नवीन पाहुणा येणार असल्याचे सांगितले आहे. तिने “Here we go again” अशा आशयाचे कॅप्शन लिहिले आहे.

गॅलने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती, तिचा पती जारोन वरसानो आणि तिच्या दोन मुलीही दिसत आहेत. या फोटोमधील खास बाब म्हणजे, गॅलचा पती आणि दोन्ही मुलींनी तिच्या बेबी बंपवर हात ठेवला आहे. गॅलचा हा फोटो आणि तिच्या कुटुंबाचा हा अंदाज खूप पसंत केला जात आहे.

गॅल आपला पती जारोन वरसानोसोबत फोटो शेअर करत असते. तिने ‘व्हॅलेंटाईन डे’ यादिवशीही आपल्या पतीसोबतचा फोटो शेअर केला होता.

ती सध्या हॉलिवूडच्या अनेक मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. ती लवकरच इजिप्तची राणी ‘क्लिओपॅट्रा’च्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. या बायोपिकमध्ये क्लिओपॅट्राच्या भूमिकेत गॅल दिसणार आहे.

गॅल चित्रपटात जी भूमिका साकारते त्यामध्ये ती एकदम उत्साहाने काम करते. ती आपल्या पती आणि मुलांवर खूप प्रेम करते. तिने जारोनच्या वाढदिवशी एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये ती आपले प्रेम व्यक्त करताना दिसत होती. तिने लिहिले होते की, “बेबी, तू माझा सर्वकाही आहेस.”

याव्यतिरिक्त तिने ‘फादर्स डे’ दिवशी एक फोटो शेअर करत लिहिले होते की, “माझ्या आयुष्यातील शानदार व्यक्ती. माझ्या मुलांसाठी यापेक्षा चांगला वडील कोणीही नाही.”

तिने मागील वर्षी २८ सप्टेंबरला आपल्या लग्न वाढदिवसाच्या दिवशी आपल्या पतीसोबत एक फोटो शेअर केला होता. तिने सांगितले होते की, १२ वर्षांचे त्यांचे वैवाहिक जीवन खूप चांगल्याप्रकारे जात आहे.

विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतही आपली तुलना गॅलसोबत करत असते. माध्यमातील वृत्तानुसार, कंगनाने म्हटले होते की, “माझ्यामध्ये गॅल गॅडोटसारखाच ग्लॅमर आणि ऍक्शन आहे.”

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अरे कुणीतरी फायर ब्रिगेडला बोलवा’, टायगर श्रॉफच्या बहिणीच्या गुलाबी बिकिनीमधील फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट

-हॉटनेस ओव्हरलोड! तेलुगु अभिनेत्रीचे स्विमिंग पूलवरील बिकिनीतील फोटोशूट होतंय व्हायरल, पाहा बोल्ड फोटो

-नादच खुळा! ‘तेरी मिट्टी’ गाण्याला आवाज देणाऱ्या बी प्राकचं नवीन गाणं रिलीझ, होतंय जोरदार व्हायरल

-बजरंगी भाईजाच्या मुन्नीने पुन्हा वेधले चाहत्यांचे लक्ष, डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल!!


Leave A Reply

Your email address will not be published.