Monday, September 25, 2023

देशभक्तीच्या रंगात रंगली ‘मुन्नी’, 77व्या स्वातंत्र्यदिनी ‘देस रंगीला’ गाण्यावर केला ‘लय भारी’ डान्स- व्हिडिओ

सन 2015मध्ये रिलीज झालेला ‘बजरंगी भाईजान‘ हा सुपरहिट सिनेमा सर्वांनाच आठवत असेल. सलमान खान आणि करीना कपूर अभिनित या सिनेमात ‘मुन्नी‘ पात्र साकारणाऱ्या हर्षाली मल्होत्रा हिने चांगलीच वाहवा लुटली होती. हीच मुन्नी आता 15 वर्षांची झाली आहे. मुन्नी सोशल मीडियावरही तुफान सक्रिय असते. तिचा इंस्टाग्रामवर 2.2 मिलियन म्हणजेच तब्बल 22 लाख चाहते फॉलो करतात. अशात मंगळवारी (दि. 15 ऑगस्ट) संपूर्ण देश 77वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. कलाकार मंडळी वेगवेगळ्या प्रकारे स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. यामध्ये हर्षाली कशी मागे राहील बरं. हर्षालीनेही 77व्या स्वातंत्र्यदिनी डान्स व्हिडिओ शेअर करून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हर्षाली मल्होत्रा व्हिडिओ
अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा (Harshaali Malhotra) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अभिनेत्रीने डान्स व्हिडिओ शेअर करत देशाप्रती आपले प्रेम व्यक्त केले आहे. हर्षाली ‘देस रंगीला’ (Des Rangeela) या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने लिहिले आहे की, “तिरंगा सदैव उंच उडो आणि आमचे हृदय अभिमानाने भरले जावो. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

या व्हिडिओत अभिनेत्री सुरुवातीला निळ्या रंगाच्या टॉपमध्ये दिसत आहे. मात्र, काही वेळातच ती केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसते. तिने केशरी रंगाची ब्रालेट, हिरव्या रंगाचा लांब स्कर्ट आणि पांढऱ्या रंगाचे जॅकेट परिधान केले आहे. हे सर्व भारतीय ध्वजाच्या रंगाचे प्रतीक आहेत. हर्षालीचा डान्स चाहत्यांची मने जिंकत आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
या व्हिडिओला आतापर्यंत 1 कोटी 13 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, व्हिडिओवर 13 लाखांहून अधिक लाईक्सचा पाऊसही पडला आहे. तसेच, तब्बल व्हिडिओवर 7 हजारांपेक्षा जास्त कमेंट्स आल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा, देव तुझं भलं करो बेटा.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “शानदार डान्स.” आणखी एकाने लिहिले की, “स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा मुन्नी मॅम.” आणखी एकाने लिहिले की, “डान्स खूपच छान आहे, तू खूप छान आहे.”

‘मुन्नी’ (Munni) म्हणजेच हर्षालीने ‘बजरंगी भाईजान’ (Bajrangi Bhaijaan) सिनेमाव्यतिरिक्त ‘लौट आओ त्रिशा’ या टीव्ही मालिकेतही काम केले होते. (actress Harshaali Malhotra celebrates Independence Day with impressive dance performance on Des Rangila see here)

महत्त्वाच्या बातम्या-
अक्षय कुमार बनला भारतीय नागरिक; पुरावा देत म्हणाला, ‘हृदय आणि नागरिकत्व, दोन्ही हिंदुस्तानी…’
जय हिंद! हातात ध्वज फडकवत ‘या’ अभिनेत्रींनी शेअर केले फोटो, दिल्या स्वातंत्रदिनाच्या ‘हटके’ शुभेच्छा

हे देखील वाचा