Thursday, September 28, 2023

भारीच ना! स्वातंत्र्यदिनी ‘Fighter’चा टीझर रिलीज, ऋतिक अन् दीपिकाचा दमदार लूक जगभरात व्हायरल

मंगळवारी (दि. 15 ऑगस्ट) देशभरात स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. या खास दिवसाचे औचित्य साधून कलाकार आपल्या आगामी सिनेमांविषयी माहिती देत आहेत. यामध्ये दोन दशकांपासून बॉलिवूड गाजवत असलेला सुपरस्टार ऋतिक रोशन याच्या नावाचाही समावेश आहे. ऋतिकने त्याच्या आगामी ऍक्शन ऍडव्हेंचर ‘फायटर’ या सिनेमाचा टीजर जारी केला आहे. मागील काही काळापासून हा सिनेमा सर्वत्र चर्चेत आहे. अशात निर्मात्यांनी स्वातंत्र्यदिनी ‘फायटर‘ सिनेमाचा टीजर जारी केला आहे.

काही दिवसांपूर्वीच ‘फायटर’ (Fighter) सिनेमातील ऋतिक रोशन (Hrithik Roshan) याचा फर्स्ट लूक जारी केला गेला होता. मात्र, इतर कलाकारांची नावे गुसदस्त्यातच होती. अशात ‘फायटर सिनेमाचा टीजर’ जारी केला असून त्यात ऋतिकसोबत दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) यांचाही लूक जारी करण्यात आला आहे.

‘वंदे मातरम’सोबत टीजर रिलीज
‘फायटर’ सिनेमाचा टीजर ऋतिकने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये 15 ऑगस्टच्या शुभेच्छा देत म्हटले की, “वंदे मातरम! भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला चित्रपटगृहांमध्ये भेटू. फायटर 25 जानेवारी 2024 रोजी जगभरात रिलीज होत आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

ऋतिक-दीपिकाचा लूक
‘फायटर’च्या टीजरच्या सुरुवातीला सर्वप्रथम ऋतिक रोशन दिसतो. अभिनेता स्क्वाड्रन लीडरच्या वेशभूषेत फायटर विमानाच्या मागे उभा असल्याचे दिसत आहे. त्याच्यानंतर टीजरमध्ये दीपिका पदुकोणची एन्ट्री होते. तीदेखील त्याच गणवेशात दिसत आहे. शेवटी अनिल कपूर हातात हेल्मेट घेऊन फायटर पायलटच्या लूकमध्ये एन्ट्री करतो.

सिनेमाची स्टारकास्ट
या सिनेमात ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोण (Hrithik Roshan And Deepika Padukone) मुख्य भूमिकेत दिसतील. याव्यतिरिक्त अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर आणि तलत अजीज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा एरियल ऍक्शनने (जे सिनेमे अवकाशात चित्रीत केले जातात) भरलेला सिनेमा असणार आहे. हा असा पहिलाच भारतीय सिनेमा असणार आहे.

केव्हा होणार रिलीज?
‘पठाण’ आणि ‘वॉर’ यांसारखे सुपरहिट सिनेमे देणारे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद ‘फायटर’चे दिग्दर्शन करत आहेत. सिनेमाच्या रिलीज तारखेविषयी बोलायचं झालं, तर हा सिनेमा पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनी रिलीज होणार आहे. ‘फायटर’ सिनेमा 25 जानेवारी, 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहात रिलीज होईल. (superstar hrithik roshan deepika padukone anil kapoor starrer fighter movie teaser out see here)

महत्त्वाच्या बातम्या-
तारीख आली रे! ‘या’ खास सणादिवशी रिलीज होणार ‘The Vaccine War’ सिनेमा, टीजरही पाहिला का?
‘Gadar 2’रिलीज झाल्यानतंर रात्रभर ढसाढसा रडत अन् खदाखदा हसत होता सनी देओल, स्वत:च केला खुलासा

हे देखील वाचा