Saturday, September 30, 2023

जय हिंद! हातात ध्वज फडकवत ‘या’ अभिनेत्रींनी शेअर केले फोटो, दिल्या स्वातंत्रदिनाच्या ‘हटके’ शुभेच्छा

आज संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. सर्व भारतीय एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. अशात मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार कसे मागे राहतील. कलाकारांनाही 77वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा केला आहे. त्यांनी चाहत्यांना शुभेच्छा देत हा सण साजरा केला. यामध्ये पुजा सावंत, सोनाली कुलकर्णी, दिपा चौधरी, उर्मिला मातोंडकर आणि धनश्री काडगावकर यांनी इंस्टाग्रामवर तिरंगा झेंड्याचा फोटो लावत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पुजा सावंतने दिल्या हटके शुभेच्छा!
प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंतने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. पूजा सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिने नुकतेच स्वातंत्र्य दिनाचे(Independence Day) निमित्त साधून काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. तसेच पोस्ट करत तिने तिच्या चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पोस्ट करताना तिने लिहिलेले की, “वन्दे नितरां भारतवसुधाम्। दिव्यहिमालय-गंगा-यमुना-सरयू-कृष्णशोभितसरसाम्”

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

 सोनाली कुलकर्णीने शेअर केला फोटो
सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने स्वातंत्र्यदिनानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने केशरी ,पांढर्‍या आणि हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “हमारा हिन्दुस्तान ज़िन्दाबाद था…ज़िन्दाबाद है…और ज़िन्दाबाद रहेगा ”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

 दीपा चौधरीने दिल्या शुभेच्छा!
दीपा चौधरी ही प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी याची पत्नी आहे. दीपा चौधरी नुकती ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात दिसली. त्यामुळे ती चर्चेत आहे. तिने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने पांढर्‍या रंगाचा कुर्ता आणि हिरव्या रंगाची ओढणी घेतली आहे. पोस्ट करताना तिने लिहिलेले की,“स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

उर्मिला मातोंडकरने दिल्या भन्नाट शुभेच्छा
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिने नुकतीच इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये उर्मिला मातोंडकर तिचा पती आणि मुलगा दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जय हिंद.”

 धनश्री काडगावकर फॅमिली फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून वहिनीसाहेब या भूमिकेनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर होय. तिने स्वातंत्र्य दिनानिमित्त फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये धनश्री तिचा पती आणि तिचा गोंडस मुलगा दिसत आहे. तिने पोस्ट करताना लिहिले की, “स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!” तिच्या या पोस्टवर चाहते कमेंटचा वर्षाव करत आहेत.

अशाप्रकारे अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Marathi actress Pooja Sawant and Sonali Kulkarni have greeted the citizens of India on the occasion of Independence Day)

अधिक वाचा-
‘इंडियन मिया खलिफा’ म्हणणाऱ्यांवर अभिनेत्रीची आगपाखड; म्हणाली, ‘त्यांनाही इज्जत…’
“चारभिंतीच्या आत गुलामगिरीचे चटके सोसतच…”, किरण मानेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

हे देखील वाचा