Monday, February 3, 2025
Home अन्य टेलिव्हिजनस्टार हिना खानचे बोल्ड ड्रेस आणि न्यूड मेकपमधील ग्लॅमरस फोटो व्हायरल

टेलिव्हिजनस्टार हिना खानचे बोल्ड ड्रेस आणि न्यूड मेकपमधील ग्लॅमरस फोटो व्हायरल

 

हिंदी टेलिव्हिजनवरील अनेक अभिनेत्री चर्चेत असतात. छोट्या पडद्यावर असून देखील अनेक अभिनेत्री चांगल्याच लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहेत. त्यांना बॉलिवूड अभिनेत्रींइतकीच अमाप लोकप्रियता मिळते. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे हिना खान होय. ‘अक्षरा’ या भूमिकेमुळे तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. हिना ही सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो देखील सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर तिची तगडी फॅन फॉलोविंग असल्यामुळे तिच्या फोटोला भरभरून प्रतिसाद मिळत असतो. अशातच तिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काळ्या रंगाच्या ड्रेसमधील काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला असून, केसांची पोनीटेल घातली आहे. पायात शूज आणि स्मोकी आय मेकअप या ड्रेसवर तिने केला आहे. तिचा हा न्यूड मेकअप तिचा लूक पूर्ण करतो. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (Actress hina khan share her glamorous photos on social media)

तिचे हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांना फोटोवरील नजर हटवणे अवघड होत आहे. या फोटोवर तिच्या अनेक चाहत्यांची प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांना तिचा हा लूक खूप आवडला आहे. तिच्या या फोटोला आतापर्यंत एक लाखापेक्षाही जास्त लाईक्स आले आहेत.

हिना खान तिच्या ‘यह रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहचली. या मालिकेतील तिच्या ‘अक्षरा’ या पात्राने तिला ओळख मिळवून दिली. तसेच ती ‘खतरों के खिलाडी’ मध्ये स्पर्धक होती. आणि ‘बिग बॉस ११’ मध्ये देखील सामील झाली होती. या नंतर ती खूपच प्रकाशझोतात आली आणि सर्वत्र तिची चर्चा चालू झाली.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

राज कुंद्रावर प्रश्न ऐकताच मीडियावर चिडली शिल्पा, म्हणाली ‘मी राज कुंद्रा आहे का?’

‘रेपिस्ट’ची प्रतिमा तयार झालेल्या रंजीत यांना लग्नासाठी मुलगी मिळणे झाले होते अवघड, मग…

सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात केलेल्या यश चोप्रा यांनी, शाहरुखसह अनेक कलाकारांना बनवले सुपरस्टार

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा