ट्रॅडिशनल असो वा वेस्टर्न, प्रत्येक लूकमध्ये खुलून दिसतंय ‘या’ अभिनेत्रीचं सौंदर्य!! पाहा पाच निवडक फोटो


सन 2017 मध्ये ‘डिअर माया’ या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री इंदुजा रविचंद्रनने तिच्या अभिनयाच्या जोरावर बरीच प्रसिद्धी मिळवली. इंदुजा तिच्या अभिनयामुळे तमिळ सिनेमाची एक उभरती स्टार म्हणून उदयास आली आहे. ती ‘मेयाधा मान (2017)’, ‘मर्क्युरी (2018)’, आणि ‘बिगिल’ (2019)’ या चित्रपटांमधील तिच्या उल्लेखनीय अभिनयासाठी प्रसिध्द आहे.

आजकाल ही अभिनेत्री तिच्या व्हायरल फोटोमुळे चर्चेचा विषय बनली आहे. नुकतेच समोर आलेले तिचे फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ट्रॅडिशनल असो वा वेस्टर्न, ती प्रत्येक लूकमध्ये गझब दिसतेय.

या व्हायरल फोटोमध्ये इंदुजाने ट्रॅडिशनलसह वेस्टर्न लूकही केलेला पाहायला मिळत आहे. तिचे हे फोटो चाहत्यांना वेड लावायला पुरेसे आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तसेच ती आगामी चित्रपट ‘खाकी’ आणि ‘फोरहेड’ मध्ये दिसणार आहे.

इंदुजा रविचंद्रनचा जन्म 1 ऑगस्ट 1994 साली, तमिळनाडूच्या वेल्लोरमध्ये झाला होता. तिने एसडीए मॅट माध्यमिक शाळेत शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे सॉफ्टवेअर अभियांत्रिकीची पदवी मिळवली. पदवी मिळविताना तिने अनेक मॉडेलिंग असाईनमेंट्स केल्या, वेगवेगळ्या भूमिकांसाठी ऑडिशन दिले. कॉलेजमध्ये आणि कॉलेजबाहेरील वेगवेगळ्या फेस्टसाठी तिने अनेक शॉर्ट फिल्म्सही केल्या.

एका ऑडिशनदरम्यान कार्तिक सुब्बराज यांनी इंदुजाला पाहिले होतेे. पाहताक्षणीच त्यांनी तिला चित्रपटात एका रोलसाठी ऑफर दिली. तेव्हा तिने ‘मेयाधा मान’ या चित्रपटात वैभवच्या बहिणीची भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

एम. सुगंथ यांनी टाइम्स ऑफ इंडियावर दिलेल्या मुलाखतीमध्ये असे म्हटले आहे की , “इंदुजाने खूप प्रभावी पदार्पण केले”. यानंतर 2019 मध्ये, तिने ‘बिगिल’मध्ये अभिनय केला, ज्यात तिने एका महिला सॉकर प्लेअरची भूमिका साकारली होती.


Leave A Reply

Your email address will not be published.