बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करून नेहमीच चाहत्यांना वेड लावत असते. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. या प्रसिद्ध अभिनेत्रीचे काही फोटो सध्या चर्चेत आहेत. या फोटोंमधील लूक पाहून चाहते तिच्या अदांवर फिदा झाले आहेत. विशेष म्हणजे, तिच्या या फोटोंना मोठ्या प्रमाणात चाहत्यांची पसंती मिळत आहे. तसेच, चाहत्यांना या फोटोवरून नजर हटवणेदेखील कठीण झाले आहे.
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. तिच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्सचा वर्षाव झाला आहे.
फोटोंमध्ये काय आहे खास?
या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे, ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. जॅकलिनच्या (Jacqueline Fernandez) या फोटोंना चाहते खास पसंती देत आहेत. जॅकलिनने वेगवेगळ्या पोझमध्ये तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यावर तिचे चाहते प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. तिने न्यूड मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत. या लूकने तिच्या चाहत्यांना भुरळ घातली आहे. तिने अनेक वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.
View this post on Instagram
जॅकलिनने शेअर केलेल्या या फोटोंना ९ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तसेच, ५ हजारांहून अधिक कमेंट्सही मिळाल्या आहेत. एका चाहत्याने तिच्या फोटोवर “हॉट,” अशी कमेंट केली आहेत. तसेच, दुसऱ्या एकाने “हाय मेरी जान,” असे लिहिले आहे.
जॅकलिन फर्नांडिस शेवटचं अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा सिनेमा ‘बच्चन पांडे’ (Bacchan Pandey) सिनेमामध्ये दिसली होती. गेल्या दोन वर्षभरात तिचे चार चित्रपट फ्लॉप झाले आहेत. तरीही निर्मात्यांनी तिच्या नावालाच पसंती दिली आहे. आतापर्यत जॅकलिनची कोणताही सिनेमा शंभर कोटींपेक्षा जास्त व्यवसाय करू शकलेला नाही. असं असलं, तरी बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम करण्याची सर्वाधिक संधी जॅकलिनला मिळाली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रणवीरच्या ‘त्या’ फोटोंवर अखेर पुनम पांडे बोललीच, म्हणाली ‘तू तर मलाच…’