Saturday, September 30, 2023

वडील अभिनेते असूनही सूर्याने केले कापड गिरणीत काम, स्वत:च्या हिमतीवर बनवली वेगळी ओळख, आज आहे सुपरस्टार

आपल्या देशात बॉलिवूड इंडस्ट्रीसोबतच अनेक प्रादेशिक मनोरंजन इंडस्ट्री देखील आहे, ज्या हिंदी चित्रपटांसोबतच त्यांच्या प्रदेशापुरते आणि राज्यापुरते सिनेमे बनवतात. पूर्वी आपल्याकडे फक्त हिंदी चित्रपटांनाच मोठी ओळख आणि प्रसिद्धी होती. मात्र, आता काळ बदलला आणि हिंदी चित्रपटांना जोरदार टक्कर देण्यासाठी अनेक प्रादेशिक सिनेसृष्टी पुढे आल्या. असे असले, तरी यासर्वांमध्ये हिंदी इतकीच कदाचित हिंदीपेक्षाही जास्त लोकप्रिय झालेली आताच्या घडीची सर्वात मोठी इंडस्ट्री म्हणजे टॉलिवूड. दाक्षिणात्य चित्रपटांनी आजच्या काळात संपूर्ण देशात, जगात त्यांची एक वेगळी छाप सोडली आहे. या इंडस्ट्रीसोबतच या इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना देखील मोठे फेम मिळाले आहे. साऊथ क्षेत्रात अनेक मोठे सुपरस्टार असून यातलाच एक सुपरस्टार म्हणजे अभिनेता सूर्या शिवकुमार. टॉल, डार्क, हँडसम अशा तिन्ही बाबींमध्ये फिट असणारा हा अभिनेता म्हणजे साऊथ इंडस्ट्रीची शान आहे. शनिवारी (दि. २३ जुलै) सूर्या त्याचा ४७वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबद्दल खास गोष्टी… 

सूर्याचा जन्म २३ जुलै, १९७५ साली तमिळनाडूच्या चेन्नई येथे झाला. त्याचे खरे नाव सरावनन शिवकुमार असे आहे. त्याचे वडील अभिनेते शिवकुमार, तर आई लक्ष्मी आहे. सूर्याचे वडील हे तमिळ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते होते. त्याचे संपूर्ण शिक्षण चेन्नईमध्येच झाले. सूर्याने कधीही अभिनेता होण्यासाठी त्याच्या वडिलांच्या नावाचा वापर केला नाही. (happy birthday suriya shivkumar know unknown facts about him)

सूर्याचा भाऊ कार्थी हा देखील अभिनेता आहे. सूर्याचे वडील प्रसिद्ध अभिनेते असले, तरी त्याने चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी कापड गिरणीत काम केले होते. त्याने तिथे आठ महिने काम केले. या काळात, तो इतक्या प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा असल्याचे त्याने त्या कंपनीत कोणालाही सांगितले नव्हते. तो इतर सामान्य लोकांसारखाच तिथे काम करत होता, पण काही काळाने त्याच्या बॉसला तो अभिनेते शिवकुमार यांचा मुलगा असल्याचे समजले, तेव्हा त्याच्या बॉसला मोठा धक्काच बसला.

कापड गिरणीत काम करणाऱ्या सूर्याला अतिशय कमी पगार होता. त्यांना दरमहा केवळ १००० रुपये पगार दिला जायचा. अभिनेते शिवकुमार यांचा मुलगा असणाऱ्या सूर्याला खूप आधीपासूनच चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. मात्र, अभिनयात रस नसल्याने त्याने तेव्हा चित्रपटात काम करण्यास साफ नकार दिला.

सूर्याला चित्रपटांसाठी विसाव्या वर्षापासूनच ऑफर यायला सुरुवात झाली होती. १९९५ साली आलेला ‘असाई’ चित्रपटात त्याला मुख्य भूमिका ऑफर झाली होती, पण त्याने सिनेमा नाकारला. मात्र, त्याचे मन बदलले आणि काही वर्षांनंतर त्याने चित्रपटात काम करण्याचे ठरवले. या चित्रपटानंतर दोन वर्षांनी १९९७ साली दिग्दर्शक वसंत यांच्या ‘नेररुक्कू नेर’ चित्रपटातून त्याने अभिनयात पदार्पण केले. सूर्याच्या सर्व चित्रपटांनाच प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला आणि त्याची अभिनयाची गाडी सुरु झाली. एकापेक्षा एक असे अनेक हिट सिनेमे त्याने दिले.

सूर्याला खरी ओळख, लोकप्रियता मिळवून दिली ती २००१ साली आलेल्या ‘नंदा’ सिनेमाने. हा सिनेमा त्याच्या आयुष्यात एक महत्वाचे वळण घेऊन आला. या चित्रपटासाठी त्याला तमिळनाडू राज्याचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देखील मिळाला. २०१० साली त्याने ‘रक्तचरित्र’ सिनेमात काम केले. आज सूर्या साऊथ इंडस्ट्रीमधील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये गणला जातो. तो एका सिनेमासाठी तब्बल २० ते २५ कोटी रुपये आकारतो. तसेच, जाहिरातीसाठी २ कोटी रुपये त्याचे मानधन आहे. त्याची एकूण संपत्ती ही जवळपास २०० कोटी रुपये इतकी आहे.

एक अभिनेता होण्यासाठी सूर्याने प्रचंड मेहनत आणि संघर्ष केला आहे. एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले होते की, “या क्षेत्रात आल्यावर प्रारंभीचा काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. या काळात मला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागायचे. माझ्यात आत्मविश्वास, फायटिंग, डान्सिंग या तीन गोष्टींची सर्वात कमी होती. त्यामुळे याचे सीन्स द्यायला मला खूप वेळ लागायचा. त्या काळात मला माझे मेंटॉर असणाऱ्या रघुवरन यांनी खूप मदत केली. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी माझ्या वडिलांपेक्षा वेगळी स्वतःची ओळख निर्माण करू शकलो.”

दाक्षिणात्य अभिनेता सूर्याने आज दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने तमिळ चित्रपट, मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्याला त्याच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. सूर्याने प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या ज्योतिकासोबत लग्न केले असून त्यांना देव आणि दिया नावाची दोन मुलं देखील आहे. ज्योतिका देखील एक लकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हिंदी चित्रपटसृष्टीला लाभलेले महान गायक मुकेश; त्यांच्यासाठी राज कपूरांनी म्हटले होते, ‘जर मी शरीर आहे, तर मुकेश…’

क्रिकेट खेळताना झाली होती लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांची भेट; मैत्री इतकी खास की, एकाचवेळी पडलेले प्रेमात

‘सख्खे भाऊ, पक्के वैरी’ म्हणीला फाट्यावर मारणारे साजिद-वाजिद, ज्यांनी सलमानलाही बनवले सुपरस्टार

हे देखील वाचा