अभिनेत्री जॅकलिनने केला ‘भूत पोलीस’ चित्रपटातील पहिला लूक शेअर; सांगितले आपल्या पात्राचे नाव


हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींकडे अनेक चित्रपटांची लाईन लागली आहे. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे जॅकलिन फर्नांडिस होय. जॅकलिनचा ‘भूत पोलीस’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा पहिला लूक अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे. हा लूक खूपच रंजक दिसत आहे. अभिनेत्री या चित्रपटात कोणते पात्र साकारणार आहे, हेही तिने सांगितले आहे.

जॅकलिन या चित्रपटात ‘कनिका’ची भूमिका साकारणार आहे. तिने आपल्या पात्राबद्दल हिंदीतील एका प्रसिद्ध म्हणीसह सांगितले आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये “लातों के भूत बातों से नहीं मानते” या म्हणीचा वापर केला आहे. तिने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आपला पहिला लूक शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करत तिने लिहिले की, “भूत पोलीसमध्ये शानदार कनिकाला भेटा.”

भूत पोलीसमधील आपला पहिल्या लूकच्या पोस्टरमध्ये जॅकलिनने आपल्या हातात एक चाबूक पकडले आहे. इतकेच नाही, तर या पोस्टरमध्ये तिने क्रॉप टॉप हाय वेस्ट जीन्स आणि जॅकेट परिधान केले आहे. (Actress Jacqueline Fernandez Shares The First Look of Her Upcoming Film)

जॅकलिनने आपल्या चित्रपटाचा पहिला लूक ११ तासांपूर्वी शेअर केला होता. या पोस्टला आतापर्यंत ७ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. जॅकलिनचे चाहते या पोस्टला भरभरून प्रतिसाद देत आहेत. सोबतच कमेंट करत आपले प्रेमही व्यक्त करत आहेत.

जॅकलिनसह या चित्रपटात अर्जुन कपूर, सैफ अली खान आणि यामी गौतम या कलाकारांचाही समावेश आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पवन कृपलानी यांनी केले आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट यावर्षी सप्टेंबरमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. मात्र, या चित्रपटाचे प्रीमियर डिझनी प्लस हॉटस्टारवर करण्यात येणार आहे. तरीही, चित्रपट निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘यार गजब आहेस तू’, श्रुती मराठेच्या ग्लॅमरस फोटोंवर चाहत्याची झक्कास कमेंट

-अभिनेत्री शगुफ्ता अलीच्या मदतीसाठी धावला जॉनी लिव्हर; आर्थिक खर्च भागवण्यासाठी विकल्यात घरातील वस्तू

-तापसी पन्नूच्या लग्नासाठी आई- वडील चिंतेत; म्हणाले, ‘आता कोणाशीही लग्न कर…’


Leave A Reply

Your email address will not be published.