Wednesday, December 18, 2024
[aioseo_breadcrumbs]

जमतंय की राव! सिद्धूने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिनला मराठी बोलायला पाडलं भाग, व्हिडिओ पाहाच

बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला मराठी बोलता येते असं नाहीये. मात्र, काही कलाकार असे आहेत, जे मोडकीतोडकी मराठी बोलून चाहत्यांचे मन जिंकतात. असेच काहीसे करत बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने सर्वांचे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे, जॅकलिनला मराठी बोलण्यासाठी सिद्धार्थ जाधव याने भाग पाडले आहे. सिद्धार्थने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत काम करत प्रचंड मोठा चाहतावर्ग कमावला आहे. त्याचा आगामी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे तो सध्या चर्चेत आहे. आता त्याच्या या मराठी सिनेमासाठी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा तिने चक्क मराठी भाषेत देताना दिसत आहे.

सिद्धार्थ जाधवचा बालभारती सिनेमा
मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हा त्याच्या ‘बालभारती’ या आगामी सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा येत्या शुक्रवारी (दि. 2 डिसेंबर) प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सिद्धार्थ व्यस्त झाला आहे. अशात सिद्धार्थने त्याच्या सिनेमाचे प्रमोशन हे थेट बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिच्याकडून करवून घेताना दिसत आहे. यादरम्यानचा एक व्हिडिओ त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये सिद्धार्थ जाधव जॅकलिन फर्नांडिसला मराठी शिकवताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

जॅकलिनचे मराठीतून आवाहन
सिद्धार्थपाठोपाठ जॅकलिन फर्नांडिस चांगली मराठी बोलताना दिसत आहे. या व्हिडिओतून ती चाहत्यांना सांगत आहे की, सिद्धार्थचा ‘बालभारती’ हा सिनेमा नक्की पाहा. विशेष म्हणजे, तिने सिनेमासाठी सिद्धार्थला शुभेच्छाही दिल्या आहेत. याव्यतिरिक्त तिने चाहत्यांना तिचा आणि सिद्धार्थचा ‘सर्कस’ हा सिनेमाही पाहण्याचे आवाहनही केले आहे. जॅकलिनव्यतिरिक्त अभिनेता वरुण शर्मा हादेखील एका व्हिडिओत सिद्धार्थकडून मराठीचे धडे घेत शुभेच्छा देताना दिसतोय.

कोण कोण दिसणार सिनेमात?
‘सर्कस’ या सिनेमाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी याने केले आहे. सिद्धार्थ आणि जॅकलिन पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दुसरीकडे, सिद्धार्थ जाधवच्या ‘बालभारती’ सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर या सिनेमात अनेक कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यात संजय मोने, आर्यन मेंघजी, उषा नाईक, रवींद्र मंकणी, नंदिता पाटकर, आणि अभिजीत खांडकेकर यांचा समावेश आहे.

जॅकलिनच्या मराठी व्हिडिओवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. तसेच, आता चाहते सिद्धार्थच्या आगामी मराठी सिनेमासाठी प्रचंड उत्सुक असल्याचे दिसत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
चाहत्यांना पुन्हा अनुभवता येणार विक्रम गोखलेंचा दमदार अभिनय, निधनानंतर झळकणार ‘या’ सिनेमात
‘वाघ कधी आणि कशी प्रतिक्रिया देईल…’, जंगल सफारी प्रकरणावर अभिनेत्रीचे स्पष्टीकरण

हे देखील वाचा