Monday, July 15, 2024

जॅकलिन फर्नांडिसच्या जामिन अर्जावर लागेल का सुटकेचा शिक्का?

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिचा एक्स बॉयफ्रेंड सुकेश चंद्रशेखर याच्या 200 कोटी मनी लॉंड्रिंग प्रकरणामुळे चांगलीच अडकली आहे. त्यामुळे तिला अनेकवेळा कोठडीत चौकशीसाठी बोलावले होते, तेव्हा तिही तेवढीच जबाबदार ठरली होती. तिला सुकेशबद्दल सगळे माहित असूनही तिने सुकेशसोबत लग्न करण्याची तयारी केली होती. मात्र, अचानक हे प्रकरण उघडकीस आलं आणि सुकेशला कोठडीत घालण्यात आले. (दि. 22 ऑक्टोंबर) रोजी तिच्या जामिन अर्जाची सुनावनी होणार आहे.

सुकेश चंद्रसेखर (Sukesh Chandrasekhar) याच्या 200 कोटी मनी लॉंड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस (jacqueline Fernandez) देखिल तेवढीच जबाबदार आहे. या प्रकरणात (दि. 17 ऑगस्ट) दिवशी एक चार्जशीट दाखल केला होता ज्यामध्ये जॅकलीनली आरोपी म्हणून दर्शवले होते. यानंतर कोर्टाने तिला नोटिस पाठवली होती. या प्रकरणामध्ये ती आरोपी ठरल्यानंतर तिच्या वकीलाने जामीनसाठी अर्ज केला होता, तेव्हा तिला पटियाला हायकोर्टतर्फे अंतरिम जामिन दिला होता. मात्र, आता तिला या प्रकरणातून नियमित जामिन मिळावा म्हणून आज कोर्टामध्ये सुनावनी होणार आहे.

ईडीने सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलीनची कसून चौकशी केली होती, तेव्हा तिने अधिराऱ्यांना पुर्णपने सहकार्य केले होते. चौकशीनुसार तिने पुर्ण सत्य सांगितले होते की, सुकेशवर तिचं खूप प्रेम होतं, एवढंच काय तर हे दोघे लग्नही करणार होते. तेव्हा तिला जामिनासाठी अंतरिम अर्ज देखिल मंजूर केला होता आता मात्र, जॅकलीनला या प्रकरणातून सुटका हवी आहे. त्यामुळे तिला नियमित जामिन हवा आहे. 22 ऑक्टोंबर दिवशी तिची पटियाला हाउस न्यालयामध्ये 2 वाजता सुनावनी होणार आहे. न्यायधिश जॅकलीनची सुटका करतील का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. या प्रकरणामध्ये फक्त जॅकलीनच नाही तर नोरा फतेही, निकिता तंबोळी अशा अनेक अभिनेत्रींचे नावे समोर आले होते मात्र, यांना फक्त चौकशी करुन सोडण्यात आले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
कॅटरिनाने खोलली विकी कौशलची पोल, म्हणाली तो खूपच सिंपल स्वभावाचा…
श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आपल्या नावामुळे नाही, तर कामातून यशस्वी होण्यावर ठेवते विश्वास!

हे देखील वाचा