‘रूही’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धमाल, पहिल्याच दिवशी ‘इतक्या’ कोटींची कमाई; लॉकडाऊननंतर सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा

Actress Jahnvi Kapoor Actor Rajkumar Rao Starrer Roohi Collects More Than 3 Crore At Box Office On Day One of Its Release


कोरोना व्हायरस नावाचे संकट अद्यापही कायम आहे. या व्हायरसमुळे सर्वच क्षेत्रांना चांगलाच फटका बसला आहे. असे असले, तरीही चित्रपट रिलीझ होऊ लागले आहेत. बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर, राजकुमार राव आणि वरुण शर्मा अभिनित ‘रूही’ हा चित्रपट गुरुवारी (११ मार्च) रिलीझ झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात मिळाली आहे. हार्दिक मेहता दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३.०६ कोटी रुपयांची कमाई केली आहे, जो लॉकडाऊननंतर रिलीझ झालेल्या आतापर्यंतच्या बॉलिवूडच्या सर्व चित्रपटांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. हा चित्रपट आठवडा संपेपर्यंत बॉक्स ऑफिसवर १० कोटी रुपयांची कमाई करेल, अशी अपेक्षा ट्रेड ऍनालिस्ट आणि चित्रपटगृह संचालकांना आहे.

ट्रेड ऍनालिस्ट अक्षय राठी ‘रूही’ चित्रपटाच्या वीकेंड कलेक्शनबाबत खूपच आशादायी आहेत. त्यांनी म्हटले की, “उत्तर भारतीय आणि टू टियर शहरांमधून अधिक कमाई झाली आहे. पहिल्याच दिवशी सायंकाळ आणि रात्रीच्या शोमध्ये प्रेक्षकांच्या संख्या चांगलीच वाढली होती. सकाळच्या तुलनेत दुपारी आणि सायंकाळ या शोमध्ये २०० टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद होती.”

सुरुवातीला केवळ २ इंग्रजी चित्रपटांनी केली १ कोटी पेक्षा अधिक कमाई
‘रूही’ चित्रपटापूर्वी बॉक्स ऑफिसवर ‘सूरज पे मंगल भारी’, ‘इंदु की जवानी’ आणि ‘मैडम चीफ मिनिस्टर’ यांसारख्या चित्रपटांची एन्ट्री झाली आहे. तरीही पहिल्या दिवसाच्या कमाईमध्ये केवळ २ इंग्रजी चित्रपटांना १ कोटीचा आकडा पार करता आला आहे. यामध्ये ‘टेनेंट’ आणि ‘वंडर वुमन १९८४’ यांचा समावेश आहे. दोन्हीही चित्रपटांनी पहिल्या दिवशी अनुक्रमे १.२१ कोटी आणि १.४५ कोटी रुपयांची कमाई केली होती. दोन्ही चित्रपटांची संपूर्ण भारतातील कमाई अनुक्रमे १२.५७ कोटी आणि १८.३६ कोटी रुपयांची होती.

‘रूही’ चित्रपटाला ६० कोटी रुपयांचा फायदा
ट्रेड ऍनालिस्टच्या मते, बॉक्स ऑफिसवर रिलीझ होण्यापूर्वी चित्रपटाचे डिजिटल अधिकार ४५ कोटी रुपयांमध्ये विकले गेले होते. सॅटेलाईट अधिकार २५ कोटी आणि म्युझिक अधिकार जवळपास २० कोटी रुपयांमध्ये विकले गेले आहेत. हा चित्रपट बनवण्यासाठी ३० कोटी रुपये खर्च झाले आहेत. अशात चित्रपट आधीपासूनच ६० कोटी रुपये फायद्यामध्ये आहे.

२२०० पेक्षा अधिक स्क्रीन्सवर रिलीझ झाला चित्रपट
जिओ स्टुडिओजच्या सीएफओ प्रियांका चौधरी यांनी सांगितले की, “आम्ही २२०० स्क्रीन्सवर हा चित्रपट रिलीझ केला आहे. प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादाने आम्ही खूप खुश आहोत.”

पीव्हीआर सिनेमाजचे सीईओ कमल ज्ञानचंदानी यांनी म्हटले की, “केवळ आपल्या सिनेेमाबद्दल बोलायचं झालं, तर आमच्या चेनमधून (फ्रँचायझी साखळी) ‘रूही’ने बॉक्स ऑफिसवर ९० लाख रुपयांची कमाई केली आहे. निश्चितच प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळत आहेत.”

त्याचबरोबर आयनॉक्सचे प्रमुख सौरभ वर्मा यांनी म्हटले की, “कोरोना व्हायरसनंतर ‘रूही’ हा चिंता दूर करणारा चित्रपट आहे. आणखी प्रेक्षक चित्रपटगृहात येत आहेत.”


Leave A Reply

Your email address will not be published.