Friday, April 26, 2024

आमिर खान आहे खऱ्या मैत्रीचे मूर्तिमंत उदाहरण; ‘लगान’मधील मित्राची ‘ही’ इच्छा केली पूर्ण

जर तुम्हाला 20 वर्षांपूर्वी रिलीझ झालेला ‘लगान’ हा चित्रपट आठवत असेल, तर त्यातील ढोल वाजविणारी व्यक्तिरेखाही तुम्हाला नक्कीच आठवेल. आमिर खान आणि त्याचा जिवलग मित्र आशुतोष गोवारीकर यांचा हा चित्रपट ऑस्करमध्ये गेला होता. चित्रपटाच्या निर्मितीच्या बर्‍याच कथा आहेत. परंतु या चित्रपटापासून सुरू होणारी एक कहाणी अशी ही आहे जी या महिन्यात थिएटरमध्ये दाखल होईल. ही एक सुपरस्टार आणि संघर्षशील अभिनेत्याची कहाणी आहे.

जेव्हा कृष्णा द्वारकाधीश झाला होता, तेव्हा सुदामा त्याला भेटायला आला होता. वहिनीच्या हातचे तांदूळ खाल्ल्यानंतर कृष्णाने सुदामाला न मागता सर्व काही दिले होते. अशाच प्रकारे या काळातील कृष्णा आणि सुदामाची कथा, म्हणजेच आमिर खान आणि अमीन हाजी यांच्या मैत्रीची कहाणी. अमीन हाजी आणि करीम हाजी हे दोन जुळे भाऊ आहेत. चित्रपट आणि दूरदर्शनवर ते नेहमी सोबत दिसतात. दोघांचे नाते खूप चांगले आहे आणि दोघे मिळून चांगले कामही करतात.

आमिर त्याची पत्नी किरण रावसोबत अजूनही ईदच्या दिवशी अमीनच्या घरी जात असतो. अमीन हाजीला सुदामाप्रमाणे या मैत्रीत काहीतरी मिळाले, ते म्हणजे आमिरने त्याचे दिग्दर्शक होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. अमीन हाजी त्याचा चित्रपट घेऊन बराच काळ इकडे तिकडे फिरत होता. त्यानंतर जेव्हा आमिरला हे कळले, तेव्हा त्याने ते केले जो एक खरा मित्र आपल्या मित्रासाठी करतो.

अमीन हाजीचा हा चित्रपट टी-सीरिजने बनवला आहे. त्या काळात टी-सीरिजचा मालक भूषण कुमारचे वडील गुलशन कुमारच्या बायोपिकसाठी आमिर खानच्या अवतीभोवती फिरत असे. आमिरने त्याला अमीन हाजीची कहाणी दिली व त्यावर चित्रपट सुरू करायला सांगितले आणि बायोपिकबद्दल नंतर बोलू असे म्हणाला. गुलशन कुमारची बायोपिक आता सुरू होणार आहे. पण त्यापूर्वी अमीन हाजीचा चित्रपट रिलीज होण्यासाठी तयार आहे.

https://www.instagram.com/p/CMO1_fnhlHc/?utm_source=ig_web_copy_link

आमिर खानने केवळ हा चित्रपट तयार करण्यात मदत केली नाही, तर त्याने या चित्रपटात विनामूल्य कामही केले आहे. ‘कोई जाने ना’ नावाच्या या चित्रपटाचा नायक कुणाल कपूर आहे. चित्रपटाचे एक गाणे बुधवारी प्रदर्शित होणार आहे. या गाण्यात ही कहाणी पहिल्यांदा जगासमोर येईल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘माझे वजन बनले होते राष्ट्रीय मुद्दा’, अभिनेत्री विद्या बालनची वाढत्या वजनावर प्रतिक्रिया, करावा लागला ट्रोलिंगचा सामना

-‘जर मला त्यावेळेस टोमने मारले नसते तर…’, ऋतिक रोशनसोबत काम केलेल्या अभिनेत्रीने सांगितली संघर्षमय कहाणी

-हृदयविकाराने पीडित असणाऱ्या लहान मुलांची सर्जरी करून ‘हा’ अभिनेता बनलाय माणसातील देवमाणूस

हे देखील वाचा