Monday, July 1, 2024

अनेक वर्षांपासून जान्हवीची हाेती ‘ही’ इच्छा, पण कपिलने डेटच दिली नाही

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूर हिचा ‘मिली‘ चित्रपट उद्या म्हणजेच 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या थ्रिलर चित्रपटासाठी ती खूप उत्सुक आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सनी कौशल आणि मनोज पाहवा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. जान्हवी सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान ती नुकतीच ‘द कपिल शर्मा शो‘मध्ये दिसली.

‘मिली’ (mili) हा मल्याळम चित्रपट ‘हेलन’चा रिमेक आहे. याबाबत जान्हवी (janhvi kapoor) हिने शोमध्ये कपिल शर्मा (kapil sharma) सोबत अनेक गोष्टी शेअर केल्या. अभिनेत्रीने सांगितले की, “ती बऱ्याच दिवसांपासून शोमध्ये येण्याचा विचार करत होती, पण लॉकडाऊनमुळे तिचा प्रत्येक प्लान फ्लाॅप झाला, पण अखेर तिला आता या शोमध्ये येण्याची संधी मिळाली.”

जान्हवी कपूर काॅमेडी शोमध्ये म्हणाली, “माझी सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे आज मी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आले आहे. आज असं वाटतंय की, या शोमध्ये आल्यानंतर कदाचित मी स्टार होण्याच्या आणखी एक पाऊल जवळ आले आहे.” शोमध्ये कपिलला चिडवताना जान्हवी म्हणाली, “सर, तुम्ही मला फक्त डेट देत नव्हता. जेव्हा ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ रिलीज होणार होता तेव्हा लॉकडाऊन सुरू होते त्यामुळे मी येऊ शकले नाही. अशा परिस्थितीत मला ‘मिली’ या चित्रपटाच्या प्रमाेशनसाठी इथे येणेच हाेते.

कपिल शर्मा शोचे कौतुक करताना जान्हवी म्हणाली, “प्रत्येक चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी प्रमोशनचे आमंत्रण मी ठरवते आणि निवडते ते म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. आज मी जी साडी नेसत आहे, ती साडी मी एक महिन्यापूर्वीच या शोमध्ये येण्याआधी ठरवली होती आणि आज ही साडी नेसण्याची संधी मला मिळाली.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
भारतात परतल्यानंतर प्रियांका चोप्रा आता मुंबईतील मरिन ड्राइव्हन केली मौजमस्ती; व्हिडिओ तुफान व्हायरल

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ…

हे देखील वाचा