Monday, June 17, 2024

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ…

मराठी चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर हे शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीला उजाळा देण्यासाठी ‘वेडात मराठे दौडले सात‘ हा नवीन चित्रपट चाहत्यांच्या भेटीला घेऊन येत आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या शुटिंगची तयारी सुरु करण्यासाठी बुधवार (दि.2 नोव्हेंबर) दिवशी कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तेव्हा अनेक कलारांसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखिल हजेरी लावली होती.

महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाचा शुभारंभ बुधवारी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांच्या हस्ते पार पडला. यावेळी नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे , चित्रपटाचे निर्माते वसीम कुरेशी, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार प्रताप सरनाईक आदी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषन केले आणि चित्रपटाप्रती आपल्या भावणा व्यक्त केल्या

“ध्येय वेडेच इतिहास घडवतात, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या आगामी चित्रपटात ध्येय आणि ते गाठण्यासाठीचे वेड देखील आहे, त्यामुळे हा चित्रपट सातासमुद्रापार जाईल”, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्य शासन कलाकारांच्या पाठीशी असून उत्तन जवळ नवीन चित्रनगरी बनविण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

eknath shinde

 

त्यासोबत मुंख्यमंत्री पुढे म्हणाले की, “शिवाजी महाराजांनी गड – किल्ल्यांची केलेली बांधणी, उंचावरील तोफा, गडावरील पाणीसाठा हे काम दूरदृष्टीचे होते. हे वैभव पाहून रयतेचा राजा नजरेसमोर येतो. त्यांच्यावरील सर्वच चित्रपटांना मोठा प्रतिसाद लाभला आहे. या चित्रपटाला देखील रसिकांचा प्रतिसाद मिळेल.” असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.

eknath shinde

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखिल मराठी चित्रपट ‘कात’ टाकतोय असे सांगून हा चित्रपट देखील भव्य बनेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी सात वीरांची भूमिका साकारणाऱ्या विराज मडके (Viraj Madke), जय बुधाने (Jay Budhane), हार्दिक जोशी (Hardik Joshi), उत्कर्ष शिंदे Utkasha Shinde), विशाल निकम (Vishal Nikam), सत्यम मांजरेकर (Styam Manjrekar) आणि प्रवीण तरडे (Pravin Tarde) या कलाकारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चित्रपटात वापरण्यात येणारी शस्त्रे प्रदान करण्यात आली. या चित्रपटात शिवाजी महाराज यांची भूमिका अक्षय कुमार (Akshay Kumar) साकारणार असून तो मराठी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार आहे.

 

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपट डिसेंबर मध्ये चित्रीकरणाला सुरूवात होणार असून सन 2023 मध्ये दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रिषभ शेट्टी नव्हे तर कांतारामधील शिवा ही भूमिका साकारणार होता ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, पण आता…
थलैवानंतर केंद्रीय मंत्री निर्मला सीतारममने ‘कांतारा’चे केले कौतुक, फोटो सोशल मीडियावर होताय व्हायरल…

हे देखील वाचा