Sunday, July 14, 2024

आलिया भट्टने नीतू कपूरसोबत थाटामाटात साजरी केली पहिली दिवाळी; चाहते म्हणाले,’परफेक्ट फॅमिली …’

बॉलिवूडचे पॉवर कपल म्हणून ओळखले जाणारे आलिया भट्ट(Alia Bhatt) आणि रणबीर कपूर(Ranbir Kapoor) लवकरच त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोघांनी या वर्षी एप्रिलमध्ये लग्न केले आणि जूनमध्ये गरोदर असल्याची घोषणा केली. सध्या दिवाळीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. सर्वसामान्य लोकांपासून बॉलिवूड कलाकारांपर्यंत दिवाळीची धूम पाहायला मिळत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिवाळीनिमित्त पार्ट्याही आयोजित केल्या होत्या. त्या पार्ट्यांना बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली. पण या सगळ्यात आलिया भट्ट कुठेच दिसली नाही. त्यांच्या बाळाच्या आगमनापूर्वी, आलिया आणि रणबीर त्यांच्या लग्नानंतर कुटुंबासोबत पहिली दिवाळी साजरी करताना दिसले.

यावेळी आलिया गरोदर असल्याने तिने ग्लॅमरस फोटोशूट करण्याऐवजी घरच्या कपड्यांमध्ये बेडरूममध्ये आराम करताना तिने फोटो शेअर केला. त्यामुळेच आलिया कुठल्याच बॉलिवूड पार्टीत आपल्याला दिसली नाही. पण आपली सासू म्हणजेच नितू कपूर यांच्या घरी रणबीर आणि आलियाने दिवाळीनिमित्त एका पूजेसाठी हजेरी लावल्याचे फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

नितू कपूर यांच्या घरातील लक्ष्मीपूजनाचे काही फोटोज त्यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या पूजेला रणबीरसह आलियादेखील हजर होती, फोटोत आपल्याला नितू कपूर पूजा करताना दिसत आहेत. आलियाबरोबरच तिची आई सोनी राजदान देखील या पूजेत सहभागी झाल्या होत्या. यानंतर नितू कपूर यांनी आलिया रणबीर आणि इतर लोकांबरोबर सेल्फी काढून तोदेखील शेअर केला. यावेळी रणबीर गोल्डन एम्ब्रॉयडरी असलेल्या काळ्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. तर आलिया गुलाबी रंगाचा पारंपारिक पोशाख परिधान करताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील गरोदरपणाची चमक तिला आणखी सुंदर बनवत आहे. हॅप्पी सेल्फी रणबीरने क्लिक केला आहे. नीतूने फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छादेखील दिल्या.

फोटो शेअर केल्यानंतर लगेचच त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी रेड हार्ट इमोजी पोस्ट करताना दिसली. चाहत्यांनीही आलिया आणि रणबीरवर खूप प्रेमाचा वर्षाव करताना दिसले. एका चाहत्याने कमेंट केली, “परफेक्ट फॅमिली पिक्चर… दिवाळीच्या शुभेच्छा.” दुसऱ्या एका चाहत्याने “मुबारकं सासू माँ और बहुरानी की पहिली दिवाळी” अशी कमेंट केली.

आलिया आणि रणबीर सध्या ‘ब्रह्मास्त्र’च्या शानदार यशाचा आनंद घेत आहेत. आलिया पुढे रॉकी आणि राणीची प्रेमकथा आणि ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. रणबीरमध्ये श्रद्धा कपूरसोबत लव रंजन आणि रश्मिका मंदान्नासोबत ऍनिमल मध्ये दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
नयनताराने दिवाळीच्या मुहूर्तावर दाखवली जुळ्या मुलांची पहिली झलक; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल
भारत-पाकिस्तान सामन्याचा आयुष्मानने शेअर केला रंजक किस्सा, जाणून घ्या एका क्लीकवर

हे देखील वाचा