Monday, July 1, 2024

हिरव्या रंगाच्या साडीमध्ये कातिल अदा दाखवताना दिसली जान्हवी कपूर

दिवाळी सणाच्या निमित्ताने अनेक कलाकार आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. चाहते देखील त्यांना कमेंटमध्ये त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील दिवाळीचा सण धूमधडाक्यात साजरा केला. या सेलिब्रेशनचे फोटोही त्यांनी सर्वांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आतापर्यंत बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यापासून ते सोनू सूदपर्यंत अनेक कलाकारांनी पोस्ट करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात जान्हवी कपूरचाही समावेश आहे. तिने वडील बोनी कपूर आणि बहीण खुशीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिघांचे बॉंडिंग स्पष्टपणे दिसत असून, जान्हवीची ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या फोटोंमध्ये बोनी कपूर आपल्या दोन्ही मुलींना मिठी मारताना दिसत आहे. खुशी कपूर गुलाबी रंगाच्या डिझायनर लेहेंग्यात खूप सुंदर दिसत आहे, तर जान्हवी हिरव्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. जान्हवीच्या साडीवर छोट्या- छोट्या आरशांची डिझाइन असून, ती या साडीत प्रचंड सुंदर दिसत आहे. तिच्या या पोस्टवर चाहते कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव करत असून, तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहे.

जान्हवी नुकतीच अभिनेत्री सारा अली खानसोबत केदारनाथ धामच्या दर्शनासाठी पोहोचली होती. तिने याचे सोशल मीडियावर फोटोही शेअर केले आहेत. यापूर्वी दोघीही रणवीर सिंगच्या ‘द बिग पिक्चर’ या शोमध्ये दिसल्या होत्या.

जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिने ईशान खट्टरसोबत ‘धडक’ चित्रपटातून २०१८ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘रूही’ देखील याच वर्षी प्रदर्शित झाला होता. आता ती धर्मा प्रॉडक्शनच्या ‘दोस्ताना २’ मध्ये दिसणार आहे. जान्हवी पुढे सिद्धार्थ सेनगुप्ता दिग्दर्शित ‘गुड लक जेरी’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ मराठी अभिनेत्रींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या चाहत्यांना दीपावलीच्या शुभेच्छा

-पारंपारिक वेशभूषेत ‘या’ मराठमोळ्या लावण्यवतींनी दिल्या दिपावलीच्या शुभेच्छा! पाहा फोटो

-रितेश भैय्याचा अंदाजच लई भारी! बच्चे कंपनीसोबतचा व्हिडिओ शेअर करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

हे देखील वाचा