दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना अभिनित ‘पुष्पा: द राइज‘ या चित्रपटाने प्रेक्षकांना अगदी वेड लावले आहे. साऊथमध्ये या चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला असून, हिंदी व्हर्जनमध्ये देखील या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रेम मिळाले आहे. या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग अनेकांच्या ओठावर आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर या चित्रपटातील अनेक डायलॉग वापरून युजर्स व्हिडिओ आणि रील्सचा भडीमार करत आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.
‘पुष्पा’ चित्रपटाचा फिव्हर आता अभिनेत्री जास्मिन भसीनवरही चढला आहे. तिनेही ‘पुष्पा’ चित्रतातील एका डायलॉगवर व्हिडिओ बनवला आहे. जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाण्यावर आतापर्यंत ७ लाखांहून अधिक इंस्टाग्राम रील्स बनवण्यात आल्या आहेत.
आता जास्मिनने (Jasmin Bhasin) पंजाबी गायक आणि अभिनेता गिप्पी ग्रेवालसोबत (Gippy Grewal) अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) स्टाईलमध्ये चेहऱ्यावर स्टेप करतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, गिप्पी ग्रेवालने जास्मिनला ‘फ्लॉवर’ समजले आणि अभिनेत्रीनेही त्याला सडेतोड उत्तर दिले आहे.
गिप्पीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये गिप्पी म्हणतो की, “जास्मिन हे नाव ऐकल्यावर एखादे फूल असेल असे वाटले. ती मुलगी असल्याचे समजले.” त्यावर जास्मिन म्हणते की, “मी मुलगी नाही, मी फायर आहे, फायर.” यानंतर गिप्पी आणि जास्मिन ‘पुष्पा’ची सिग्नेचर स्टाईल मारतात.
या व्हिडिओला आतापर्यंत १६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच २ लाख ५० हजारांहून अधिक लाईक्सचा पाऊसही पडला आहे. यासोबतच व्हिडिओ पाहिल्यानंतर ८ हजारांहून अधिक युजर्स त्यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. त्यातबरोबर ते जास्मिनच्या स्टाईलचे कौतुक करत आहेत.
जास्मिन भसीन गिप्पी ग्रेवालसोबत पंजाबी चित्रपट ‘हनीमून’चे शूटिंग करत आहे. हा व्हिडिओ अभिनेत्रीने चित्रपटाच्या सेटवरच बनवला आहे.
हेही वाचा-