नव्या नवेली नंदा हिने तिचा पॉडकास्ट शो ‘व्हॉट द हेल’ सुरू केला आहे. या शाेमध्ये जया बच्चन आल्या हाेत्या. नव्या आणि मुलगी श्वेता नंदासोबतच्या संभाषणात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल अनेक खुलासे केले. जया, श्वेता आणि नव्या त्यांच्या फ्रेंड सर्कलबद्दल बोलत होत्या. या संभाषणात खुलासा झाला की, जया बच्चन यांच्या सात मैत्रिणी आहेत, ज्यांना त्या बऱ्याच दिवसांपासून ओळखतात. जया बच्चन यांच्या या ग्रुपचे ‘सात सहेली’ असे नाव आहे. नव्या आणि श्वेता जया बच्चन यांच्या फ्रेंड सर्कलला याच नावाने ओळखतात.
अभिनेत्री जया बच्चन यांनी नुकताच खुलासा केला की, “अमिताभ यांना त्यांच्या मैत्रिणींनी घरी येणे-जाणे अजिबात आवडत नाही.” जया बच्चन यांनी हे देखील म्हणाले की, “अमिताभ आता म्हातारे हाेत आहे आणि पूर्वीपेक्षा ते खूप बदलले आहे.” जया बच्चन यांचा हा खुलासा खूपच चकीत करणार हाेता. जया बच्चन यांनी ही गाेष्ट नव्या नवेली नंदा हिच्या शाेमध्ये सांगितली.
View this post on Instagram
जया बच्चनच्या मैत्रिणी घरी आल्यावर मुलगा अमिताभ बच्चन आणि नातीन अगस्त्यला खूप आनंद होतो, पण अमिताभ बच्चन यांचा चेहरा पडलेला असताे. जया बच्चन म्हणाल्या की,”माझ्या मैत्रिणी जेव्हा घरी येतात तेव्हा अमिताभ यांची चिडचिड होते.” त्या नव्याला म्हणतात, “तुझे आजोबा खूप चिडतात.” ते म्हणतात, ” माफ करा महिलांनाे, तुमची हरकत नसेल तर मला वरच्या मजल्यावर जायचे आहे. असे सांगून ते उठून जातात. माझ्या मैत्रीणी खूप खुश हाेतात, जेव्हा ते निघून जातात.”
जया म्हणाल्या की… अमितजी झाले म्हातारे
आजी जया बच्चन यांच्याकडून हे ऐकून, नव्या म्हणते की, आजेबांच्या उपस्थितीमुळे त्यांच्या मैत्रिणींना थोडे अस्वस्थ हाेत असेल, तेव्हा जया म्हणाल्या, अस्वस्थ नाही हाेत. त्या अमिताभ बच्चन यांना अनेक वर्षांपासून ओळखतात. ते आता बदलले आहेत. बघितल्या गेले, तर त्याचेही आता वय झाले आहे. तुम्ही म्हातारे (शारीरिक आणि मानसिक) होऊ शकता आणि म्हातारे झाले, तरी म्हातारे होऊ शकत नाही. मी म्हातारी नाही आहे. मी 18 वर्षांच्या तरुणाशीही बोलू शकते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘आरआरआर’ सिनेमाची क्रेझ सातासमुद्रापार, चित्रपट सुरू असतानाच चाहत्यांनी ‘नाटो नाटो’वर लावले ठुमके
‘गॉडफादर’साठी कशी झाली सलमानची निवड? कास्टिंग काऊचचा उल्लेख करत सलमानचा धक्कादायक खुलासा