Thursday, May 23, 2024

‘आरआरआर’ सिनेमाची क्रेझ सातासमुद्रापार, चित्रपट सुरू असतानाच चाहत्यांनी ‘नाटो नाटो’वर लावले ठुमके

साऊथ इंडस्ट्रीतील दिग्गज दिग्दर्शकांमध्ये एसएस राजामौली यांच्या नावाचा समावेश होतो. राजामौली यांनी यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांपैकी एका सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. तो सिनेमा इतर कोणता नसून ‘आरआरआर’ आहे. ‘आरआरआर’ या सिनेमाने फक्त भारतातीलच नाही, तर जगभरातील चित्रपटगृहात धुमाकूळ घातला आहे. प्ररदर्शनाच्या 8 महिन्यांनंतरही हा सिनेमा परदेशात धमाल करत आहे. अशातच एख व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये काही लोक अमेरिकेच्या लॉस एंजेलिस शहराच्या एका चित्रपटगृहात या सिनेमाच्या स्क्रीनिंगदरम्यान ‘नाटू नाटू’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

‘आरआरआर’चा जलवा परदेशातही
ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दिसते की, काही लोक चित्रपटगृहात ‘आरआरआर’ (RRR) या सिनेमातील ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स करत आहेत. इतकेच नाही, तर अनेक लोक त्यांची साथ देण्यासाठी गाण्यातील सिग्नेचर स्टेप करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, ‘आरआरआर’ सिनेमाच्या या गाण्याची क्रेझ ही प्रेक्षकांमध्ये कमालीची आहे.

इतकेच नाही, तर लॉस एंजेलिसच्या या चित्रपटगृहात उपस्थित इतर लोक या मोजक्याच लोकांना नाचताना पाहून जोरात टाळ्यांचा कडकडाट करत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरात व्हायरल होत आहे. चाहते या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचाही वर्षाव करत आहेत. ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 11 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sumit Kadel (@sumitkadelofficial)

बॉक्स ऑफिसवर ‘आरआरआर’ने केली होती धमाल
दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या ‘आरआरआर’ हा बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. जवळपास 500 हून अधिक कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने जगभरात बॉक्स ऑफिसवर हजारो कोटी रुपयांची कमाई केली होती. या सिनेमात सुपरस्टार राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘गॉडफादर’साठी कशी झाली सलमानची निवड? कास्टिंग काऊचचा उल्लेख करत सलमानचा धक्कादायक खुलासा
बघतोस काय रागानं, गाडी घेतलीया वाघानं! ‘सैफीना’च्या ताफ्यात आलिशान कारचा समावेश, तैमूरने घेतली राईड

हे देखील वाचा