Monday, July 1, 2024

वडापाव खाल्ल्याशिवाय कामाला देखील लावत नव्हते राजेश खन्ना, जया प्रदा यांनी केला खुलासा

राजेश खन्ना (Rajesh khanna)  हे हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या अभिनयाचे आणि चेहऱ्याचे आजही अनेक चाहते आपल्याला पाहायला मिळतात. हिंदी चित्रपट जगतातील ते सगळ्यात मोठे अभिनेते म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या सोबत काम केलेल्या अभिनेत्री जया प्रदा यांनी राजेश खन्ना यांच्याबद्दलचे अनेक खुलासे एका मुलाखतीत केले होते. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या एका खास सवयीची नोंद केली होती काय होती ही सवय चला जाणून घेऊ.

राजेश खन्ना हे आपल्या दमदार अभिनयासाठी हिंदी चित्रपट जगतात प्रसिद्ध होते. अनेक दर्जेदार चित्रपट त्यांनी अभिनय केला आणि ते चित्रपट सुपरहिट करून दाखवले. यशाच्या शिखरावर असलेल्या या प्रतिभावान अभिनेत्याचा दरारा सुद्धा तसाच होता. सेटवर नेहमी उशीरा येणे ही त्यांची सवय होती. परंतु त्यांना बोलायची कोणाची हिंमत नव्हती इतकी त्यांची लोकप्रियता होती. त्यांच्या सोबत काम केलेल्या अभिनेत्री जया प्रदा यांनीही राजेश खन्ना यांच्या काही विशेष आवडी निवडी सांगितल्या होत्या.

एका मुलाखतीत बोलताना अभिनेत्री जया प्रदा यांनी राजेश खन्ना सेटवर नेहमीच उशिरा यायचे असा खुलासा केला आहे. मी सेटवर 9 ला जावून सगळे काम करायचे मात्र राजेश खन्ना रात्री उशीरा सेटवर जायचे असे यावेळी जया प्रदा यांनी सांगितले.या मुलाखतीत राजेश खन्ना यांच्या आणखी एका विशेष सवयीची आठवण सांगताना त्या म्हणाल्या की “राजेश खन्ना सेटवर आल्यानंतर पहिल्यांदा वडा पाव खात होते आणि मगच त्यांच्या कामाला सुरुवात करायचे. तो सुद्धा फक्त एक शॉट लगेच पॅकअप करायला लावायचे.” राजेश खन्ना आणि जया प्रदा यांनी नया कदम, मकसद, आवाज अशा गाजलेल्या चित्रपटात काम केले आहे.

हे देखील वाचा