बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री काजोल आणि प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण याची मुलगी न्यासा देवगण हिने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी ती कायमच चर्चेत असते. न्यासा ही बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली स्टार किड आहे. न्यासा अनेकदा तिच्या लूकसाठी चर्चेत असते. सध्या दिवाळीच्या काळात ही स्टार किड अनेक कलाकारांच्या पार्टीला हजेरी लावताना दिसत आहे. नुकतीच भूमी पेडणेकर हिच्या दिवाळी पार्टीत न्यासा गोल्डन लेहेंग्यात दिसली होती. या पार्टीदरम्यानचे तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले हाेते. अशात आता ही अभिनेत्री पुन्हा एकदा तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
न्यासा देवगण (nysa devgn) हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिच्या चाहत्यांसाठी तिला ओळखणे कठीण होत आहे. न्यासा निळ्या रंगाच्या कारमध्ये हिरव्या रंगाच्या लेहेंगा परिधान करुन पार्टीला जाताना दिसली. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये न्यासा खूपच सुंदर दिसत आहे.
View this post on Instagram
युजर्सने न्यासाला केले प्रचंड ट्राेल
मात्र, न्यासा देवगणचा हा व्हिडिओ समोर आल्या नंतर बरेच लोक तिला ओळखू शकले नाहित. या व्हिडिओमध्ये काजोलच्या लेकीचा लूक काहीसा बदललेला दिसत आहे. सोशल मीडिया यूजर्सच्या म्हणण्यानुसार, “न्यासावर शस्त्रक्रिया झाली आहे.” ज्यामुळे युजर्स तिला यासाठी प्रचंड ट्राेल करत आहेत.
युजर्सने न्यासाची तुलना केली जान्हवी कपूरसाेबत
या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्सनी न्यासाच्या लूकबाबत अनेक कमेंट्स केल्या आहेत. अनेक युजर्सनी तिने नक्कीच सर्जरी केल्याचे सांगितले, तर काही युजर्सनी तिच्या लूकची तुलना जान्हवी कपूरशी केली आहे. तिच्या व्हिडिओवर कमेंट करताना, एक युजर्सने लिहिले की, “जान्हवी कपूर आणि न्यासा देवगन एकाच सर्जनकडे गेल्याचे दिसते.”
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘थँक गॉड’च्या बहाण्याने सिद्धार्थ कियारासोबत घालवणार खास क्षण! हे मनोरंजक काम करणार आज रात्री
अरे वाह! ऋतिकने गर्लफ्रेंडसोबत साजरी केली पहिली दिवाळी, सबा आझादने शेअर केले फोटो










