आर्यनपाठोपाठ आता न्यासानेही चाखली ‘त्याची’ चव, अजय देवगणच्या लेकीचा ग्रीसमधील व्हिडिओ व्हायरल

0
108
Nysa-Devgan
Photo Courtesy: Instagram/nyasa_devgan

अभिनेता अजय देवगण याची मुलगी न्यासा देवगण सध्या तिची सुट्टी एन्जॉय करत आहे. अलीकडेच त्याचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले होते, जे काही वेळातच व्हायरल झाले होते. यावेळी तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती उघडपणे डान्स करताना दिसत आहे. अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगण सध्या तिच्या काही जवळच्या मित्रांसोबत ग्रीसमध्ये सुट्टी घालवत आहे.

चाहत्यांना खूप आवडला हा डान्स व्हिडिओ
न्यासा देवगण (Nysa Devgan) हिचा ग्रीसमध्ये पार्टी करतानाचा हा व्हिडिओही चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये न्यासा खूपच सुंदर दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, न्यासा तिचे ड्रिंक टेबलवर ठेवते आणि नंतर नाचू लागते. तिथे बसलेला तिचा खास मित्र ओरी आणि तिथे उपस्थित असलेले सर्व लोक न्यासाचा हा डान्स पाहून खूप खुश आहेत. न्यासा देवगण आणि तिच्या मैत्रिणींनी अलीकडेच वरुण धवन (Varun Dhavan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांचीही भेट घेतली ते त्यावेळी ऍमस्टरडॅममध्ये शूटिंग करत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nysa Devgan (@nyasa_devgan)

न्यासा स्वतः घेणार तिच्या करिअरशी संबंधित निर्णय
अलीकडेच माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत काजोलने न्यासाच्या चित्रपटात येण्याबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. “कोणत्याही गोष्टीवर निर्णय घेताना आपल्याला संशयाच्या भोवऱ्यात टाकले जाणार नाही,” असे ती म्हणाली होती. काजोल म्हणाली की, “न्यासाला तिने चित्रपटसृष्टीत प्रवेश करावा की नाही हे मी कधीही सुचवणार नाही. हा न्यासाचा निर्णय आहे, जो तिने स्वतः घ्यावा.”

वेदांत महाजनला डेट करतीये न्यासा?
माध्यमांतील वृतानुसार, अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगण सध्या स्वित्झर्लंडमध्ये इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटीचे शिक्षण घेत आहे. अलीकडेच न्यासा देवगणशी संबंधित बातम्याही समोर आल्या होत्या की, ती वेदांत महाजनला डेट करत आहे. सोशल मीडियावर आतापर्यंत दोघांचेही अनेक फोटो समोर आले आहेत. मात्र, दोघांनीही यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

दु:खद! क्रिकेट खेळताना प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, पत्नी अन् मुलाला सोडून गेला देवाघरी

रणवीरपूर्वी चार पैशांसाठी ‘या’ कलाकारांनी सोडलेली लाज, जगासमोर झालेले उघडे; यादीतील नावे खळबळ माजवणारी

गजबच! १५ मिनिटात लग्न आणि ४ तासात मेहंदी, ‘असा’ घाईघाईत पार पडलेला ‘अनुपमा’चा लग्नसोहळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here