Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड पोटची लेक ट्रोल झाल्यावर चिंतेत पडते काजोल? म्हणाली, ‘मी असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल…’

पोटची लेक ट्रोल झाल्यावर चिंतेत पडते काजोल? म्हणाली, ‘मी असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल…’

बॉलिवूड कलाकार जेवढे चर्चेत असतात, तेवढीच चर्चा त्यांच्या मुलांचीही असते. असेच एक कलाकार जोडपे आहे, ज्यांची मुलगी सध्या तुफान चर्चेत आहे. हे कलाकार जोडपे म्हणजेच अजय देवगण आणि काजोल होय. या जोडप्याची मुलगी न्यासा देवगण हीदेखील चाहत्यांमध्ये भलतीच प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर त्यांची लोकप्रियता प्रचंड आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र, काजोल आणि न्यासा त्यांच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे नेहमीच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असतात. अशात काजोल हिने प्रतिक्रिया देत मत मांडले आहे.

माध्यमांशी बोलताना अभिनेत्री काजोल (Kajol) हिला विचारण्यात आले की, सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर तिची प्रतिक्रिया काय आहे? या प्रश्नावर उत्तर देताना काजोलने म्हटले की, ट्रोलिंग सोशल मीडियाचा एक वेगळा भाग बनला आहे. यानंतर ती हसत म्हणाली की, जर कुणाला ट्रोल केले जाते, तर त्याचा अर्थ असतो की, ते प्रसिद्ध आहेत.

‘स्पष्ट आहे की, तुमच्यावर लक्ष दिले जाते’
काजोल पुढे म्हणते की, “जेव्हाही तुम्हाला ट्रोल केले जाते, तेव्हा याचा अर्थ स्पष्ट आहे की, तुमच्यावर लक्ष दिले जाते. जर तुम्हाला ट्रोल केले जात असेल, तर तुम्ही प्रसिद्ध आहात. असे वाटते की, जोपर्यंत तुम्हाला ट्रोल केले जात नाही, तोपर्यंत तुम्ही प्रसिद्ध नसता.”

ट्रोलिंगचा काय परिणाम होतो?
यादरम्यान काजोलाल विचारण्यात आले की, ट्रोलिंगचा तिच्यावर काय परिणाम होतो? यावर तिने म्हटले की, असे होते, पण मी या गोष्टी गांभीर्याने घेण्याची एक मर्यादा असते. ती म्हणाली की, “त्याचा माझ्यावर परिणाम होत नाही असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल. पण हो, एका मर्यादेपर्यंत तुम्ही यावर विचार करता. ट्रोलिंगबद्दल अनेक लेख लिहिले गेले आहेत, पण जेव्हा जाऊन कमेंट्स तपासते, तेव्हा समजते की, शेकडो सकारात्मक कमेंट्स आणि एखाद दोन नकारात्मक कमेंट्स आहेत, ज्यांच्यावर लेख लिहिले जातात.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

मुलगी न्यासाला काय सल्ला देते?
काजोलने यावेळी सांगितले की, ती मुलगी न्यासा देवगण (Nysa Devgan) हिला काय सल्ला देते. ती म्हणाली की, “मी न्यासाला समजावते की, घाणेरड्या कमेंट्स पोस्ट करणाऱ्यांपेक्षा जास्त संख्या तुमच्या चाहत्यांची आहे. ते विचार करतात की, तू शानदार आहेस. याठिकाणी हे समजणे गरजेचे आहे की, तू आरशात काय पाहते? कुणाचे मत तुझ्यासाठी महत्त्वाचे आहे? माझे मत महत्त्वाचे आहे, तुझे नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

काजोलच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर ती शेवटची 2021मध्ये रिलीज झालेल्या ‘त्रिभंगा’ या सिनेमात झळकली होती. आता तिच्या खात्यात ‘सलाम वेंकी’ हा सिनेमा आहे. तिच्या या सिनेमासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. (actress kajol reacted on daughter nysa devgan)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘आमचा भेडिया जंगली झालाय, हे प्रेमही नाहीये आणि…’, सुपरस्टार प्रभाससोबत डेटिंगवर अभिनेत्रीचे भाष्य
‘लोकं आमच्या इंडस्ट्रीची चेष्टा करायचे’, साऊथ सिनेमांविषयी ‘भल्लाळदेव’ स्पष्टच बोलला

हे देखील वाचा