नव्वदचे दशक गाजवणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी अनेक अभिनेत्री अजूनही अभिनयात सक्रिय आहेत. यामध्ये काजोल हिच्या नावाचाही समावेश होतो. काजोल सध्या तिच्या ‘सलाम वेंकी’ या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्रीने तिच्या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी कंबर कसली आहे. अशात तिच्याविषयी अशी चर्चा रंगली आहे की, काजोल आणखी एका सिनेमात झळकणार आहे, जो खूपच खास असेल. कारण, यामधून सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खान पदार्पण करत आहे. काजोलही याचा भाग बनू शकते. इब्राहिम, करण जोहरच्या सिनेमातून पदार्पण करतोय.
काजोल आणि करण जोहर (Karan Johar) यांची गणना इंडस्ट्रीतील सर्वात चांगल्या मित्रांमध्ये होते. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र मानले जातात. त्यांनी एकमेकांसोबत ‘कुछ कुछ होता है’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ आणि ‘कभी खुशी कभी गम’ यांसारख्या शानदार सिनेमात काम केले आहे. काजोल शेवटची करणच्या ‘माय नेम इज खान’ या सिनेमात एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. या सिनेमानंतर चाहते पुन्हा एकदा या जोडीला एकत्र काम करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
अशात चर्चा रंगली आहे की, काजोल आणि करण जोहर 12 वर्षांनंतर पुन्हा एकत्र काम करणार आहेत. काजोल सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) याच्या पदार्पणाच्या सिनेमात काम करण्यासाठी तयार आहे. नाव निश्चित नसलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन बोमन इराणी यांचा मुलगा कायोज इराणी करणार आहे. हा सिनेमा धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, एका सूत्राने सांगितले की, “या सिनेमात काजोल एका अशा महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहे, जी भावनिकरीत्या खूपच मजबूत आहे. ती इब्राहिमसोबत जास्तीत जास्त स्क्रीन टाईम शेअर करणार आहे.” सूत्राने पुढे असेही सांगितले की, “इब्राहिमनेही सिनेमासाठी आपली तयारी सुरू केली आहे. तो काजोलसारख्या अनुभवी अभिनेत्रीसोत काम करण्यासाठी खूपच उत्सुक आहे.”
काजोलच्या सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर ती शेवटची 2021 ‘त्रिभंगा’ या मराठी सिनेमात झळकली होती. आता चाहत्यांना काजोलच्या आगामी सिनेमाची उत्सुकता लागली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘अंड्याची भूर्जी आणि राखी सावंतची मर्जी…’, मराठी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री करताच ड्रामा सुरू
चाहत्यांना भावला पारंपारिक ड्रेसमधील कॅटरिनाचा साधेपणा; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’