अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी न्यासा देवगण अनेकदा तिच्या पार्टी आणि व्हेकेशनचे फोटो शेअर करून सोशल मीडियावर दहशत निर्माण करते. काही महिन्यांपूर्वी लॅक्मे फॅशन वीक २०२२ मध्ये, १८ वर्षीय न्यासाने प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राच्या नवीनतम कलेक्शनसाठी मॉडेलिंग केली होती. तेव्हापासून ती सेलिब्रिटींच्या कार्यक्रमांमध्ये सार्वजनिकरीत्या दिसते. न्यासाचे ग्लॅमरस फोटो पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की, ती बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार आहे?
काजोलची आहे करियरबाबत मुलांना सूट
माध्यमांशी बोलताना अभिनेत्री काजोल (Kajol) हिने तिची मुले न्यासा (Nysa) आणि युग (Yug) यांच्या बॉलिवूडमध्ये करियर बनवण्याबद्दल सांगितले. ती म्हणाली की, “मला वाटते माझ्या मुलांना काहीही करायचे असेल, तर मी त्यांना सपोर्ट करेन. ज्यामध्ये त्यांना आनंद मिळेल ते, ते करतील. त्यांचा आनंद आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. मला वाटते की, आई म्हणून माझे सर्वात मोठे काम तिला चित्रपटसृष्टीत मार्गदर्शन करणे नाही. त्यापेक्षा त्यांना आनंदी ठेवणे आणि त्यांना समाजाचा उत्पादक सदस्य बनवणे आहे.”
स्वतःचे निर्णय घेण्यास न्यासा सक्षम
न्यासाच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल आणि सोशल मीडिया सेन्सेशन असण्याबद्दल विचारले असता काजोल म्हणाली की, “मला वाटते की, न्यासा स्वत:चे निर्णय घेऊ शकते. मी म्हटल्याप्रमाणे, मी तिला बॉलिवूडपासून दूर नेत नाही. मी तिला काहीही करण्यास भाग पाडणार नाही. ती जे काही करेल, ती स्वतःसाठी करेल. ती १८ वर्षांची, हुशार आणि स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम मुलगी आहे.”
View this post on Instagram
अजय काजोलची लेक परदेशात घेत आहे शिक्षण
अजय देवगण आणि काजोल यांची लेक न्यासा देवगण सध्या स्वित्झर्लंडच्या ग्लायॉन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमध्ये इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटीचे शिक्षण घेत आहे. याआधी ती शाळेच्या शेवटच्या काही काळासाठी तीन वर्षे सिंगापूरमध्ये होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बादशाहला नव्हते बनायचे गायक?, म्हणाला, ‘आतापर्यंत चुकीच्या ठिकाणी होतो…’
तिसऱ्यांदा गरोदर राहिल्याच्या बातम्यांवर संतापली करीना; म्हणाली, ‘मी काय यंत्र…’
प्रेग्नंसीच्या चर्चांमध्ये बिपाशाच्या लेटेस्ट पोस्टवर खिळल्या सर्वांच्या नजरा, फोटोमध्ये काय आहे खास?