Saturday, April 20, 2024

‘या’ धमाकेदार वेबसिरीजमधून अभिनेत्री काजोल करणार ओटीटी पदार्पण, चाहत्यांना लागली उत्सुकता

काजोल (Kajol) ही हिंदी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ९० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून काजोलचे नाव घेतले जाते. हिंदी सिने जगतात ९० चे दशक काजोलच्या बहारदार चित्रपटांनी आणि अभिनयाने चांगलाच गाजले होते. सध्या ती सिने जगतापासून दुर असली लवकरच ओटीटी पदार्पण करणार असल्याची माहिती समोर आली आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ. 

लोकप्रिय काजोल (Kajol) सध्या खूप चर्चेत आहे आणि तिच्याबद्दल बातम्या येत आहेत की ती फक्त मोठ्या पडद्यावरच नाही तर ओटीटीवर धमाका करणार आहे. बातम्या येत आहेत की डिस्नी प्लस हॉटस्टार प्रोजेक्टसह त्यांच्या वेब सीरिजमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.  ज्याची अलीकडेच स्ट्रीमिंग जायंटच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर घोषणा करण्यात आली होती. लवकरच एका लोकप्रिय वेब सीरिजमध्ये अभिनेत्री काजोल दिसणार आहे. पण गंमत म्हणजे ज्या सीरिजसाठी तिला अप्रोच करण्यात आले ती सीरिज बोल्ड सीन्ससाठी खूप प्रसिद्ध आहे.

काजोल लवकरच नेटफ्लिक्सच्या ‘लस्ट स्टोरीज’ (lust stories)या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे.  ज्याचा पहिला सिझन २०१८ मध्ये आला होता. समोर आलेल्या माहितीनुसार निर्मात्यांनी काजोलच्या दुसऱ्या भाग ‘लस्ट स्टोरी-२’ साठी संपर्क साधला आहे.

हेही वाचा – खरं की काय! अजयच्या चित्रपटात काजोल करणार शाहरुखसोबत रोमान्स?, एका क्लिकवर घ्या जाणून

अरर! शाहरुख खानचा ‘हा ‘फोटो झाला सोशल मीडियावर व्हायरल, भडकले चाहते

अंतराची कातील अदा अन नेटकरी झाले फिदा! अभिनेत्री योगिता चव्हाणच्या बोल्ड फोटोंनी लावले नेटकऱ्यांना वेड

 

हे देखील वाचा