Saturday, April 20, 2024

चाहत्यांना भावला पारंपारिक ड्रेसमधील कॅटरिनाचा साधेपणा; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’

परदेशातून भारतात येऊन बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये कॅटरिना कैफ हिचा समावेश होतो. कॅटरिना बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या सुंदरतेचा प्रत्येक चाहता दीवाना आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते गर्दी करतात. वेस्टर्न असो किंवा पारंपारिक, ती जे कपडे परिधान करते, त्यावर चाहत्यांच्या नजरा खिळतात. अशात तिचा विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ती लाल रंगाच्या सूटमध्ये दिसली. विशेष म्हणजे, तिने या व्हिडिओत जो सूट परिधान केला होता, त्याची किंमत जवळपास 30 हजार इतकी होती.

कॅटरिना कैफचा 30 हजारांचा सूट
अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) ही नुकतीच ‘फोन भूत‘ (Phone Bhoot) या सिनेमात झळकली होती. मात्र, हा सिनेमा अपेक्षित यश मिळवू शकला नाही. मात्र, या सिनेमातील तिचा अंदाज प्रेक्षकांना भावला. अशात अभिनेत्री तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत कॅटरिना लाल रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, अनिता डोंगरे ब्रँडच्या या सूटची अधिकृत साईटवरील किंमत ही जवळपास 29 हजार 900 रुपये असल्याचे सांगितले गेले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

चाहत्यांना वाटली प्रेग्नंट
कॅटरिनाचे साध्या लूकमधील सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. चाहत्यांना तिचा साधेपणा घायाळ करत आहे. तसेच, चाहते तिची प्रशंसा करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, “खूपच सुंदर.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “गोरे गोरे मुखडे पर काला काला चष्मा.” आणखी एकाने असे लिहिले की, “हिचा साधेपणा सर्वांना दीवाना बनवत आहे.” एकाला तर चक्क असे वाटले की, “कॅटरिना प्रेग्नंट तर नाही ना?”

Katrina-Kaif-Fan-Comment

Katrina-Kaif-Fan-Comment

कॅटरिनाचे सिनेमे
कॅटरिना कैफ हिच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर ती सलमान खान (Salman Khan) याच्यासोबत ‘टायगर 3’ सिनेमा झळकणार आहे. याव्यतिरिक्त ती साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती (Vijay Sethupathi) याच्यासोबत ‘मेरी क्रिसमस’ या सिनेमातही काम करत आहे. हा सिनेमा पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. तसेच, ती ‘जी ले जरा’ या सिनेमाचाही भाग आहे. (actress katrina kaif looks gorgeous at airport in red suit worth rupees 30 thousand)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘आपली महान संस्कृती आहे, पण मला वाईट वाटतं…’, प्रसिद्ध अभिनेत्रीचे महिलांच्या कपड्यांवरून खळबळजनक विधान
सिनेमात गुंडांच्या नाकी नऊ आणणाऱ्या अजय देवगणची ‘या’ गोष्टीमुळे टरकते, वाचा कोणती आहे ती गोष्ट

हे देखील वाचा