Wednesday, March 27, 2024

‘अंड्याची भूर्जी आणि राखी सावंतची मर्जी…’, मराठी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री करताच ड्रामा सुरू

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध, पण तितकाच वादग्रस्त म्हणून ओळखला जाणारा शो म्हणजेच ‘बिग बॉस’ होय. या शोला पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांचा इतका मोठा प्रतिसाद मिळाला की, आज हा शो वेगवेगळ्या भाषेतही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हिंदी बिग बॉसपाठोपाठ बिग बॉस मराठीलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बिग बॉस मराठी शोचे सध्या चौथे पर्व सुरू आहे. अशात ‘बिग बॉस मराठी 4’मधून मोठी बातमी समोर येत आहे. या शोमध्ये ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत हिची एन्ट्री झाली आहे.

‘बिग बॉस’ या शोच्या 1, 14 आणि 15 पर्वामध्ये झळकणारी राखी सावंत ‘बिग बॉस मराठी 4’ (Rakhi Sawant Bigg Boss Marathi 4) शोमध्ये सामील झाली आहे. राखी सावंत वाईल्ड कार्ड एन्ट्री घेत बिग बॉसच्या घरात आली. तिच्या येण्याने फक्त स्पर्धकच नाहीत, तर प्रेक्षकांनाही हैराण केले आहे. चॅनेलने यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रविवारी (दि. 27 नोव्हेंबर) समृद्धी घरातून बाहेर पडली. यानंतर बिग बॉसने सर्वांनाच धक्का देत एक-दोन नाही, तर थेट चौघांना घरात पाठवले. यामध्ये राखी सावंत (Rakhi Sawant) हीदेखील सामील होती. तिच्याव्यतिरिक्त इतर तिघांमध्ये मीरा जगन्नाथ, विशाल निकम आणि आरोह वेलणकर यांनी जबरदस्त एन्ट्री केली. राखी ‘बिग बॉस मराठी’मध्ये आल्यानंतर घरात ड्रामेबाजी होणारंच होती आणि झालीदेखील. याचा प्रत्यय पहिल्याच दिवशी आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

राखीने घरात एन्ट्री करताच स्पर्धक अपूर्वा नेमळेकर हिची फिरकी घेतली. तिने घरात प्रवेश करताच अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) हिला आवाज देत म्हटले की, ‘ए शेवंते…’ राखीने असे म्हणताच, सर्वजण जोरजोरात हसू लागले. पुढे ती म्हणाली की, “मी या सर्वांची आई आहे.” ती इथेच थांबली नाही, तर तिने पुढे म्हटले की, “बिग बॉसची पहिली बायको आहे. अंड्याची भूर्जी आणि राखी सावंतची मर्जी इथे चालणारंच.”

राखी सावंतचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. आता ती पुढे काय काय करते हे पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
चाहत्यांना भावला पारंपारिक ड्रेसमधील कॅटरिनाचा साधेपणा; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’
‘आपली महान संस्कृती आहे, पण मला वाईट वाटतं…’, प्रसिद्ध अभिनेत्रीचे महिलांच्या कपड्यांवरून खळबळजनक विधान

हे देखील वाचा