Friday, July 5, 2024

‘महिला वॉशिंग मशीन आहेत का आणि पुरुषांना…?’, कंगनाच्या वक्तव्याने खळबळ, लगेच वाचा

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर जगभरात चाहतावर्ग मिळवला आहे. या अभिनेत्री आपल्या अभिनयाव्यतिरिक्त रोखठोख वक्तव्यासाठीही ओळखल्या जातात. या अभिनेत्रींमध्ये कंगना रणौत हिच्या नावाचाही समावेश होतो. कंगनाला ‘धाकड गर्ल’ म्हणूनही ओळखले जाते. कंगना तिच्या बेधडक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. कंगनाचा सोशल मीडियावरही मोठा वावर आहे, ज्यावर ती फोटो, व्हिडिओव्यतिरिक्त आयुष्यातील गोष्टीही शेअर करत असते. अशात तिने सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती विचारताना दिसत आहे की, “महिला वॉशिंग मशीन आहे का, जिचा वापर केला जातो?”

कंगनाने शेअर केला व्हिडिओ
अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत आहे. या व्हिडिओत ती म्हणताना दिसत आहे की, “संमतीने बनलेल्या नात्यात, नेहमी असे का होते की, महिलेचा वापर केला जातो आणि पुरुषाला मजा येते? तो कसली कामे करतो? महिला वॉशिंग मशीन आहे का, जिचा वापर केला जातो?”

व्हिडिओत अभिनेत्री पुढे म्हणते की, “जर हे संमतीने बनले होते, तर उघड उघड आहे की, पुरुषाला मजा येत असेल, तर महिलेलाही मजा यावी.” कंगनाचा हा व्हिडिओ आता चर्चेत आहे.

कंगनाचे सिनेमे
कंगनाच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं, तर ती आगामी ‘चंद्रमुखी 2’ (Chandramukhi 2) आणि ‘इमर्जन्सी’ (Emergency) सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘इमर्जन्सी’ सिनेमात कंगना भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात मिलिंद सोमण, अनुपम खेर, श्रेयस तळपदे आणि दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

याव्यतिरिक्त ‘चंद्रमुखी 2’ सिनेमा हा 2005 सालच्या सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) अभिनित ‘चंद्रमुखी’ सिनेमाचा सीक्वेल आहे. या सिनेमासाठी कंगना खूपच उत्सुक आहे. (actress kangana ranaut asks is woman a washing machine video viral see here)

महत्त्वाच्या बातम्या-
ठरलं रे! ‘या’ चित्रपटात दिसणार सीमा-सचिनची लव्हस्टोरी; एकदा वाचाच
जेष्ठ विचारवंतांच्या निधनावर किरण माने यांची भावूक पोस्ट; म्हणाले, ‘रक्तबंबाळ झालं होतं पण…’

हे देखील वाचा