Monday, September 25, 2023

‘ही साहसाची वेळ नाही’, कंगना रणौतने चाहत्यांना दिला माेलाचा सल्ला; म्हणाली…

बॉलिवूडची ‘पंगा गर्ल’ कंगना राणौत नेहमीच काेणत्या ना काेणत्या कारणाने चर्चेत असते. कंगना कायमच काेणावर न काेणावर कमेंट करताना दिसते. मात्र, यावेळी अभिनेत्री चर्चेत येण्याचे कारण वेगळे आहे. खरे तर, कंगना स्वत: हिमाचल प्रदेशची रहिवासी आहे आणि आजकाल मुसळधार पावसाने हिमाचल प्रदेशात विध्वंस केला आहे. अशात अभिनेत्रीने हिमाचलमधील परिस्थितीवर आपले मत व्यक्त केले आहे. चला, तर मग जाणून घेऊया काय म्हणाली अभिनेत्री.

खरे तर, जाेरदार पावसाने संपूर्ण उत्तर भारत हैराण झाला आहे. दिल्लीसह उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात विध्वंसाचे नवे दृश्य पाहायला मिळत आहे. हे पाहता कंगना (kangana ranaut) हिने तिच्या चाहत्यांना आवाहन केले आहे की, हिमाचल प्रदेशसारख्या डोंगराळ भागात जाणे टाळावे आणि सध्या कोणत्याही प्रकारच्या प्रवासाचे नियोजन करू नका. यासोबतच अभिनेत्रीने असेही सांगितले की, पावसाळ्यात कुटुंबियांसोबत घरात सुरक्षित राहणे समजदारी असेल.

Kangana Ranaut
Photo Courtesy: Instagram/kanganaranaut

कंगनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर हिमाचलच्या विध्वंसाचे काही व्हिडिओ शेअर करत एक स्टोरी शेअर केली आणि म्हणाली, “महत्त्वाची माहिती: हिमाचल प्रदेशला जाऊ नका. संततधार पावसामुळे अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या काही दिवसात भूस्खलन आणि पुराचा धोका आहे. पाऊस थांबला तरी पावसाळ्यात हिमाचलला भेट देऊ नका. आपल्या कुटुंबासह आपल्या घरी सुरक्षित रहा आणि एकमेकांची काळजी घ्या.”

कंगना राणौतच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री सध्या तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये ती दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ‘तेजस’ हा चित्रपटही अभिनेत्रीजवळ आहे. यामध्ये ती एअरफोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाचा ‘तेजस’ 20 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे.(bollywood actress kangana ranaut advised fans not to go to himachal pradesh says this is not the time for adventure )

अधिक वाचा-
शोएब इब्राहिम पत्नी अन् चिमुरड्याला घेऊन रुग्णालयातून आला बाहेर, फोटो व्हायरल
‘बाईपण भाई देवा’ फेम अभिनेत्री वंदना गुप्ते यांना अटक? प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा