Monday, October 2, 2023

जेष्ठ विचारवंतांच्या निधनावर किरण माने यांची भावूक पोस्ट; म्हणाले, ‘रक्तबंबाळ झालं होतं पण…’

किरण माने हे त्यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे सतत चर्चेत येत असतात. त्यांनी स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मलिकेत अभिनय करून प्रत्येक घराघरात ओळख निर्माण केली आहे. किरण माने यांना साकारलेला विलासराव देशमुख यांची भूमिका प्रत्येकाच्या मनात घर करून गेली. या किरण माने यांनी प्रेक्षकांचे मन जिंकली. ते सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. किरण माने यांनी नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे बुधवारी निधन झाले आहे. वयाच्या 70 व्या वर्षी मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. महात्मा फुले यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून हरी नरके यांना ओळखले जात होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आहे. त्याच्या निधननंतर किरण माने यांनी एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी ‘मुलगी झाली हो’ या मालिकेबद्दल आणि प्रा. हरी नरके यांच्याबद्दल भाष्य केले आहे.

किरण माने (Kiran Mane) यांनी फेसबुकवर भलिमोठी पोस्ट लिहिली आहे. त्यांनी पोस्ट करताना लिहिले की, “माझ्यावर झालेल्या खोट्या आरोपांविरूद्ध आणि अन्यायाविरूद्ध जीव खाऊन लढत होतो. मन रक्तबंबाळ झालं होतो पण मागं हटायचं नाही हे पक्कं ठरवलं होतं. अशावेळी सगळ्या गोष्टींची सत्यासत्यता पडताळून मला भावनिक बळ देणारी… माझ्या खरेपणावर विश्वास ठेवून, सतत फोन मेसेज करून मानसिक आधार देणारी जी मोजकी आणि मोठी लोकं होती त्यातले एक प्रा. हरी नरके !

मला त्याकाळातला आमचा एक मोठा फोन काॅल स्पष्ट आठवतो, ज्यात नरकेसरांनी माझ्या न्याय मिळवण्याच्या मार्गात कुणी-कुणी अडथळे आणले… त्यांचे हेतू काय होते… त्या लोकांचा इतिहास-भुगोल… त्यांनी माझं कशा पद्धतीनं खच्चीकरण करण्याचा प्लॅन आखला… ते सगळं सगळं अतिशय विस्तारानं आणि लाॅजीकल उदाहरणं देऊन समजावून सांगीतलं. त्यांनी आणखीही एक सल्ला दिला, जो खूप महत्त्वाचा होता… ‘आता या वाद-प्रतिवादांमध्ये वेळ आणि शक्ती खर्च करू नकोस. तू अभिनेता म्हणून पुन्हा उभं रहाणं हेच सगळ्या आरोपांवर खणखणीत उत्तर असेल.’

आज एक वर्षानंतर मी सगळ्यावर मात करून पुन्हा उभा रहातोय. माझ्यावर आलेल्या त्या भयाण संकटाच्या वेळी मला अडथळे आणणारे, खचवणारे यांना मी माफ केलंय. कणभरही रोष-कटुता काही काही नाही. पण त्याकाळात माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे रहाणारे मोजके लोक होते त्यांना शेवटच्या श्वासापर्यन्त विसरू शकत नाही. त्या विपरीत परिस्थितीला मागं टाकून अभिनेता म्हणून माझी पहिली कलाकृती टी.व्ही.वर येतीये. परवाच माझ्या मनात आलं की, ही सुंदर कथा छोट्या पडद्यावर येताना सगळ्यात पहिल्यांदा मला त्या देवमाणसांच्या चेहर्‍यावरचं हास्य मला पहायचं आहे, ज्यांनी मला वाईट काळात साथ दिली… त्यातले एक तुम्ही होतात, सर.

नरकेसर… तुमचे पुरोगामी विचार आणि त्यासंबंधीचं तुमचं कार्य यावर अनेकांनी लिहीलंय. मी एवढंच सांगतो की ज्या महात्मा फुलेंच्या जीवनावर, कार्यावर, विचारांवर अभ्यास करण्यात तुम्ही हयात घालवलीत त्या फुलेंच्या विचारांनी प्रेरीत झालेला, सगळ्या दुनियेचा विरोध पत्करून मुलीच्या शिक्षणासाठी रक्ताचं पाणी करणारा एक गरीब शेतकरी मी साकारतो आहे ! माझी अभिमान साठे ही ‘भुमिका’ पहायला तुम्ही हवे होतात सर…”

किरण माने यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. किरण माने यांनी कलर्स मराठीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मलिकेत मुख्य भूमिका बजावली आहे. ही मालिका 15 ऑगस्टपासून संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. (Kiran Mane about the series Mulgi Jhali Ho and Prof. Commentary on Hari Narke)

अधिक वाचा- 
दक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूच्या आलिशान घराचे फोटो पाहिले का? ‘इतके’ कोटी रुपये आहे घराची किंमत
महेश बाबूला बॉलिवूड का परवडत नाही? शेवटी, या साऊथ सुपरस्टारची फी आणि नेटवर्थ किती? घ्या जाणून

हे देखील वाचा