सिनेविश्वातील कलाकार हे त्यांच्या कामाप्रती किती जागरूक असतात, याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी येत असता. या कलाकारांमध्ये अभिनेत्री कंगना रणौत हिच्या नावाचाही समावेश होतो. कंगनाच्या कामाप्रती समर्पणाबद्दल प्रत्येकालाच माहिती आहे. मात्र, आता पुन्हा एकदा हे दाखवून दिले आहे की, ती तिच्या कामाबाबत किती गंभीर आहे.
अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिला डेंग्यू (Kangana Ranaut Dengue) झाला आहे. मात्र, तरीही ती आजारणाच्या स्थितीत विश्रांती घेण्याऐवजी आपल्या ‘इमर्जन्सी’ या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिच्या ‘मणिकर्णिका फिल्म्स’ प्रॉडक्शन टीमने तिच्या कामादरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच, तिने कॅप्शनमध्ये या गोष्टीचा खुलासाही केला आहे.
मणिकर्णिका फिल्म्सकडून ‘इमर्जन्सी’ सिनेमाच्या सेटवरून कंगनाचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, “जेव्हा तुम्ही डेंग्यूने ग्रस्त असता, तुम्हाला जास्त ताप असतो आणि तुमच्या पांढऱ्या पेशीही वेगाने कमी होत असतात. मात्र, यानंतरही तुम्ही कामावर येता, हे पॅशन नाही, वेडेपणा आहे. आमची मुख्य कंगना रणौत एक अशीच प्रेरणा आहे.”
दुसरीकडे, मणिकर्णिका फिल्म्सकडून कंगणाचा आणखी एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “कंगना रणौतला अधिक शक्ती. लवकर बरे व्हा मॅडम.” ही पोस्ट रिपोस्ट करत कंगनाने लिहिले आहे की, “धन्यवाद, मणिकर्णिका फिल्म्स टीम. माझे शरीर आजारी पडले आहे, माझा आत्मा नाही. तुमच्या शब्दांसाठी खूप खूप धन्यवाद.”

‘इमर्जन्सी’ या सिनेमाच्या नावावरूनच समजते की, कंगनाचा हा आगामी सिनेमा २५ जून, १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घोषित केलेल्या आणीबाणीच्या स्थितीबद्दल आहे. चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यासिनेमाचे संवाद रितेश शाह यांनी लिहिले आहेत. त्यांनी यापूर्वी ‘कहाणी’, ‘पिंक’ आणि ‘एअरलिफ्ट’ यांसारख्या प्रसिद्ध सिनेमांचेही संवादलेखन केले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
असं का बरं! रिलीझनंतर स्वत:च्या सिनेमाकडे ढुंकूनही पाहत नाहीत बॉलिवूड सुपरस्टार्स, मोठ्ठं आहे कारण
धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न, रक्ताच्या थारोळ्यात दवाखान्यात केले दाखल
मौनीने पतीचा वाढदिवस बनवला यादगार, अभिनेत्री बोटीतच झाली रोमँटिक; फोटो व्हायरल