Tuesday, March 21, 2023

मौनीने पतीचा वाढदिवस बनवला यादगार, अभिनेत्री बोटीतच झाली रोमँटिक; फोटो व्हायरल

छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास करण्यात खूप कमी कलाकारांना यश मिळते. हे यश मिळवण्यात यशस्वी ठरलेली अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय होय. मौनी ही तिच्या अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. मौनीचा पती सूरज नांबियार हा मंगळवारी (दि. ०९ ऑगस्ट) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त अभिनेत्री मौनीने त्याला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच तिने रोमँटिक फोटोही शेअर केले आहेत.

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या आयुष्यातील चमचमता तारा आणि जगातील सर्वात चांगली मिठी आणि पप्पी देणाऱ्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! मी तुझ्याशी अनंतकाळ राहण्याची वाट पाहू शकत नाही. तू माझा सर्वकाही आहेस आणि माझा सर्वात सुंदर भाग आहेस.” यासोबतच मौनीने अनेक फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही समुद्रात बोटीमध्ये रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. काही फोटोंमध्ये दोघेही लिपलॉक करतानाही दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

मौनी यावर्षी सूरज नांबियारसोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. दोघेही सन २०१९मध्ये पहिल्यांदा भेटले होते. तसेच, मौनी पाहताक्षणीच सूरजच्या प्रेमात पडली होती. यानंतर दोघांनीही एकमेकांना डेट केले आणि २०२१मध्ये त्यांचे नाते अधिकृत केले होते. मौनी नेहमीच सूरजसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असते. चाहत्यांनाही या दोघांची जोडी खूप आवडते.

मौनीच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर ती अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि नागार्जुन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडला आहे. अशात निर्मात्यांना या सिनेमाकडून भरपूर अपेक्षा आहेत. हा सिनेमा पुढील महिन्यात ९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-
सोनमने घालवली कपूर खानदानाची इज्जत! म्हणाली, ‘माझ्या मैत्रिणींसोबत झोपलेत माझे सर्व भाऊ’
विमानतळावर नेहा कक्करला पाहून चाहतीला कोसळले रडू; नेटकरी म्हणाले, ‘ओव्हरऍक्टिंगचे ५० रुपये कट’
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यालाच आवडत नाहीये त्याचा अभिनय, स्वत:च सांगितले धक्कादायक कारण

हे देखील वाचा