Friday, July 5, 2024

कंगनाच्या ‘तेजस’ चित्रपटाची रिलीझ डेट आली समोर, ‘या’ तारखेला चित्रपटगृहांमध्ये होणार धमाका

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. त्याचबरोबर ती सतत तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. नुकतीच तिच्या नवीन चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. ‘तेजस’ (Tejas) चित्रपटात कंगना एका फायटर जेटच्या पायलटची भूमिका साकारत आहे. कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ‘तेजस’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

कंगनाने तिचा हा चित्रपट २०२२ च्या दसऱ्याला प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर केले आहे. तेजसच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली. चित्रपट निर्माते आरएसवीपी यांनी देखील मंगळवारी (७ डिसेंबर) प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. तेजस सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन सर्वेश मेवाडा यांनी केले आहे. आरएसवीपीने यापूर्वी सर्जिकल स्ट्राईकवर आधारित ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट तयार केला होता. या चित्रपटात विक्की कौशल (Vicky Kaushal) मुख्य भूमिकेत दिसला होता. ‘उरी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.

‘तेजस’हा चित्रपट ५ ऑक्टोबर २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आपल्या सोशल मीडिया हँडलवर ‘तेजस’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना, आरएसव्हीपीने लिहिले की, “ही एका महिलेची कथा आहे जिने आकाशाला स्पर्श करण्याचा निर्णय घेतला. भारतीय हवाई दलाला समर्पित हा चित्रपट दसऱ्याला ५ ऑक्टोबर २०२२ ला प्रदर्शित होणार आहे.” ‘तेजस’चे शूटिंग नोव्हेंबर महिन्यात संपले. कंगनाने शुटींगच्या शेवटच्या दिवशी झालेल्या पार्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

कंगनाचा ‘तेजस’नंतर ‘धाकड’ हा चित्रपटही प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ‘धाकड’ चित्रपटात कंगना एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार असून, यानंतर कंगना ‘’द इंकारनेशन ऑफ सीता’ या पौराणिक चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एवढेच नाही, तर कंगनाच्या होम प्रोडक्शनच्या ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटावरही तिचे काम सुरू आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. काही महिन्यांपूर्वी तिचा ‘थालयवी’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. सिनेमाला प्रेक्षक आणि समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

हेही वाचा- 

भोजपुरी सुपरस्टार पवनसिंगच्या आगामी गाण्याच्या टिझरचा सोशल मीडियावर धुमाकूळ, काही काळातच टिझर ट्रेंडिंगमध्ये

रस्त्यावर लोकांना थांबवून थांबवून फुलं देताना दिसला कार्तिक आर्यन, पण काय आहे कारण?

BIGG BOSS 15: राखी सावंतच्या पतीने केला मोठा खुलासा, स्वतः च्या भूतकाळाबद्दल सांगितले ‘असे’ काही

 

हे देखील वाचा