×

आलिया भट्टने गीतेमधील श्लोक म्हणत कंगना रानौतच्या टीकेला दिले सडेतोड प्रत्युत्तर

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आलियाचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे आलिया पहिल्यांदाच पडद्यावर डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळेच चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण बॉलिवूडची पंगा गर्ल म्हणजेच कंगना रणौतने आलियाच्या या चित्रपटाबद्दल वाईट बोलली आहे. कंगनाने तिच्या एका पोस्टमध्ये ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट धुळीला मिळणार असल्याचे म्हटले होते. इतकेच नाही, तर शुक्रवारी २०० कोटी रुपये जाळणार असल्याचेही कंगनाने सांगितले होते. त्याचवेळी आलियाने आता कंगनाच्या या गोष्टींवर प्रतिक्रिया दिली आहे.

नुकतेच ‘गंगुबाई काठियावाडी’मधील ‘मेरी जान’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याच्या लाँचिंगवेळी आलिया (Alia Bhatt) कोलकात्यात गेली होती. यातच कंगनाच्या (Kangana Ranaut) बोलण्याला आलियाने सडेतोड उत्तर दिले आहे. यावेळी आलियाने भगवद्गीतेतील एक गोष्ट सांगितली आहे. कंगनाला उत्तर देताना आलियाने भगवद्गीतेतील एक श्लोक उच्चारला आहे. ती म्हणाली की, “भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे की, काहीही नाही केले तरी अनेकवेळा करणे असते. मला एवढेच म्हणायचे आहे.” या चर्चेत आलियाने कंगना रणौतचे नाव घेतले नाही. मात्र आता आलिया कंगनाला तिच्या कामातून उत्तर देण्याची तयारी करत असल्याचे मानले जात आहे.

कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये तिने आलियाचे नाव न घेता लिहिले की, “या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर २०० कोटी जळून राख होतील. पापाची (चित्रपट माफिया डॅडी) परी, ज्याकडे ब्रिटीश पासपोर्ट आहे. त्याला हे सिद्ध करायचे आहे की रोम कॉम बिम्बो अभिनय करू शकते. शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची सर्वात मोठी कमतरता म्हणजे या चित्रपटाची कास्टिंग. हे कधीच सुधारणार नाहीत. आता हॉलिवूड आणि दक्षिणेकडे पडदे सरकले आहेत यात आश्चर्य नाही.” तिच्या दुसऱ्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये, कंगना रणौतने करण जोहरला ‘बॉलिवूड माफिया डॅडी पापा’ म्हणत त्याची खिल्ली उडवली. कंगनाने लिहिले की, “बॉलिवूडचे माफिया डॅडी पापा ज्यांनी एकट्याने फिल्म इंडस्ट्रीतील वर्क कल्चर नष्ट केले आहे.”

आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट संजय लीला भन्साळी दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटात शंतनू माहेश्वरी आलियावर रोमान्स करताना दिसणार आहे. याची झलक ‘मेरी जान’ या गाण्यात पाहायला मिळाली आहे. आलिया आणि शंतनू व्यतिरिक्त या चित्रपटात अजय देवगण, विजय राज आणि सीमा पाहवा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा –

बुरखा घालून चित्रपट पाहायला गेलेल्या माधुरी दीक्षितला ‘या’ कारणामुळे अर्धवट चित्रपट सोडत काढावा लागला होता पळ

Latest Post