Sunday, May 19, 2024

कंगनाची आता राजकारणात एन्ट्री? ‘या’ पक्षाकडून निवडणुक लढवण्याच्या तयारीत; म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कंगना तिच्या अभिनयासोबतच तिच्या परखड मतांसाठी ओळखली जाते. आज कंगनाला संपूर्ण जगामध्ये ओळखले जाते. मात्र इथे पोहचण्यासाठी तिने खूपच कष्ट आणि मेहनत केली आहे. अनेक गोष्टींचा त्याग करत स्वबळावर आणि हिमतीवर आज कंगनाने ‘क्वीन ऑफ बॉलिवूड’ ही ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडची दबंग अभिनेत्री म्हणून कंगना रनौत ओळखली जाते. कंगनाने अनेक चित्रपटांमध्ये उत्तम काम केले आहे.

बॉलिवूडसह सामाजिक मुद्द्यांवर कंगना (Kangana Ranaut ) तिची मतं मांडत असते. अलीकडेच, कंगना रनौत राजकारणात एन्ट्री करण्याच्या विचारात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एका दिलेल्या मुलाखतीत कंगना रनौतला राजकारणात एन्ट्री करण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी अभिनेत्री म्हणाली, “कलाकार असल्यामुळे राजकारणात एन्ट्री करण्याबद्दल मी खूप इच्छुक आहे. पण सध्या तरी मी राजकारणात एन्ट्री करणार नाही. भारत देश प्रत्येक दिवशी प्रगती करत आहे.”

कंगना रनौत पुढे म्हणाली, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची मला संधी मिळाली. दोन-तीन वर्षांपूर्वी मी त्यांना भेटले होते आणि आता पुन्हा हा योग आला. मोदी सरकार आल्यापासून देशात प्रगती होत आहे ही आनंददायी बाब आहे. देशात सकारात्मक बदल होत आहेत. 2024 च्या निवडणुकीत फक्त भगवा रंग पाहण्याची माझी इच्छा आहे.”

कंगना रनौतच्या वक्तव्यावरुन 2024 मध्ये ती मोदी सरकारला पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तसेच कंगनाने जर राजकारणात एन्ट्री घेतली तर भाजपमधून निवडणूक लढवू शकते. कंगना रनौत राजकारणात एन्ट्री करणार का? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. ही अभिनेत्री लवकरच साऊथ सिनेमात काम करणार आहे. कंगनाचा आगामी चित्रपट ‘चंद्रमुखी 2’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अभिनेत्री साऊथचा सुपरस्टार राघव लॉरेन्ससोबत स्क्रीन शेअर करणार आहे. (Actress Kangana Ranaut will enter politics)

आधिक वाचा-
‘महाराजांचं नाव फक्त धर्माच्या अंगानं…’; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष
‘बिग बॉस 17’मध्ये अंकिता लोखंडेनंतर ‘ही’ अभिनेत्री करणार एंट्री; एकदा वाचाच

हे देखील वाचा