‘पंगा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेचा विषय बनत असते. अलीकडेच भारताला १९४७ मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याला तिने ‘भीक’ म्हटले. तिच्या या वक्तव्यामुळे तिला अनेक अडचणींना सामोरे जावे आहे. या वक्तव्यानंतर अनेक कलाकारांनी कंगनावर जोरदार टीका केली. आता अलीकडेच ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनीही सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर करून कंगनावर टीका केली आहे. यासोबतच त्यांनी कंगनाच्या वक्तव्याला ‘बालिश’ म्हटले आहे.
‘माझ्या मते हे विधान बालिश होते’
‘महाभारत’ आणि ‘शक्तिमान’ सारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेले मुकेश खन्ना यांनी पोस्टमध्ये कंगनाचा एक फोटो शेअर करत लिहिले की, “अनेक लोक मला वारंवार म्हणत आहेत की, देशाच्या स्वातंत्र्यावरील वक्तव्यावर तुम्ही टिप्पणी केली नाही. का? मी सांगतो की, मी दिले आहे, पण कदाचित वाचले गेले नाही. म्हणून मला ते जाहीरपणे सांगावे असे वाटले. मला वाटते की, हे विधान बालिश होते. ते हास्यास्पद होते. ते खुशामत करणारे होते. अज्ञान दाखवते किंवा पद्म पुरस्काराचा दुष्परिणाम होता. हे मला माहित नाही.”
अशी वादग्रस्त विधाने करणे करा बंद
मुकेश यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “परंतु सर्वांना हे माहित आहे आणि आपला देश १९४७ च्या १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र झाला यावर आपण विश्वास ठेवतो. कोणीही त्याला वेगळे करण्याचा प्रयत्न करणे मूर्खपणाचे ठरेल. मात्र, येथे मला असे सांगायचे किंवा गाणे गायचे की, आम्हाला खडग विना ढाल स्वातंत्र्य दिले, साबरमतीचे संत म्हणून तुम्ही केली कमाल…हे वास्तवापासून दूर आहे.”
“वस्तुस्थिती अशी आहे की, ब्रिटिश सरकारपासून सुटकेची भीती जर कोणी मनात निर्माण केली असेल, तर ती होती देशातील असंख्य क्रांतिकारकांचे बलिदान, सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद फैजची भीती आणि त्यांच्याच सैनिकांचे बंड. त्यामुळे अशी वादग्रस्त विधाने करणे थांबवा,” असेही त्यांनी पुढे लिहिले.
या पोस्टद्वारे अनुभवी अभिनेत्याने वादग्रस्त बी-टाऊन अभिनेत्रीला अशी वादग्रस्त विधाने करणे थांबवण्यास सांगितले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-एफआयआर दाखल केल्याची माहिती देताना कंगनाने शेअर केला तिचा बोल्ड फोटो
-बॉलिवूडची सर्वात यशस्वी स्क्रिप्ट रायटरची जोडी ‘सलीम – जावेद’ तुटली तरी कशी, जाणून घ्या